नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या संघटनेच्या भारतात प्रसार रोखण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या असल्याचे गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले.इसिसच्या प्रसारामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि रोजगारासंबंधी उपक्रमांना धोका निर्माण होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहेत, असे ते म्हणाले. इसिसने विविध मार्ग अवलंबत युवकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न चालविले असून, विशेषत: सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याची माहिती गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इस्लामिक स्टेटविरुद्ध उपाययोजना -रिजिजू
By admin | Published: December 08, 2015 11:33 PM