शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

प्रदूषणावर उपाय; दिल्लीसह राजधानी क्षेत्रात यंदा फटाक्यांविना दिवाळी, सुप्रीम कोर्टाने पुन्हा लागू केली बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 1:08 AM

नवी दिल्लीसह संपूर्ण महानगर दिल्ली आणि संपूर्ण राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) शोभेच्या आणि आवाजाच्या अशा दोन्ही प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवरील महिनाभरापूर्वी तहकूब केलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा

नवी दिल्ली : नवी दिल्लीसह संपूर्ण महानगर दिल्ली आणि संपूर्ण राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) शोभेच्या आणि आवाजाच्या अशा दोन्ही प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवरील महिनाभरापूर्वी तहकूब केलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा लागू केल्याने लाखो दिल्लीवासीयांना यंदाची दिवाळी फटाक्यांविना साजरी करावी लागेल.दिल्लीत थंडीच्या महिन्यांत हवेचे प्रदूषण, श्वास घेणेही मुश्कील व्हावे, एवढे वाढते. दिवाळीत फटाक्यांच्या धुराने परिस्थिती आणखी बिकट होते, याची दखल घेत न्यायालयाने काही नागरिकांनी केलेल्या याचिकांवर दिल्ली आणि ‘एनसीआर’ क्षेत्रात फटाक्यांची विक्री स्थगित करण्याचा आदेश गेल्या वर्षी ११ नोव्हेंबर रोजी दिला होता. त्यानंतर फटाक्यांचे उत्पादक, विक्रेते व परवानाधारक यांनी केलेली विनंती मान्य करून न्यायालयाने विक्रीवरील ही बंदी तहकूब केली होती. मूळ याचिकाकर्ते, स्वयंसेवी संस्था व इतरांनी केलेल्या अर्जांच्या निमित्ताने न्या. ए. के. सिक्री, न्या. अभय मनोहर सप्रे व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने या विषयाचा फेरविचार केला आणि बंदी तहकूब करण्याचा आधीचा निर्णय १ नोव्हेंबरनंतर लागू होईल, असा आदेश दिला.लाखोंच्या रोजगारावर गदा येईल, फायर क्रॅकर्स असोसिएशनची भीती-न्यायालयाचा हा निकाल एकतर्फी आणि अन्याय्य आहे. अशा प्रकारे हळूहळू देशभरात फटाक्यांवर बंदी घातली जाईल आणि त्यामुळे या उद्योगावर पोट भरणाºया लाखो लोकांच्या रोजगारावर गदा येईल, अशी भीती तामिळनाडू फायर क्रॅकर्स अ‍ॅण्ड अ‍ॅमॉरसेस असोसिएशनचे अध्यक्ष असाई तंबी यांनी व्यक्त केली.देशभरातील ८५ टक्के फटाक्यांचे उत्पादन शिवकाशी आणि परिसरात होते. वर्षाला ही उलाढाल १० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. प्रत्यक्ष फटाक्यांच्या कारखान्यांत तेथे तीन लाख लोक काम करतात. आणखी पाच लाख लोक याच्याशी संबंधित पूरक उद्योग-व्यवसायांवर पोट भरतात. याशिवाय देशभर फटाक्यांची विक्री करणारे लाखो विक्रेते वेगळेच.

टॅग्स :diwaliदिवाळीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय