नवी दिल्ली : कुस्तीपटूंच्या दिल्लीतील धरणे आंदोलनाचा आज २७ वा दिवस आहे. महापंचायत घेऊन खाप पंचायतींना सरकारला दिलेल्या अंतिम मुदतीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. तथापि, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे २१ मेनंतर या आंदोलनाला मोठे स्वरूप मिळू शकते. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.
पदकाची किंमत केवळ १५ रुपये आहे. परत करायचेच असेल तर करोडो रुपयांचे रोख बक्षीस परत करा. फेडरेशन, सरकार आणि जनतेने दिलेला हा पैसा असल्याचे ब्रिजभूषण यांनी म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे.
हे पदक मेहनतीचे फळबजरंग पुनिया म्हणाला की, हे पदक वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीमुळे आणि करोडो देशवासीयांच्या आशीर्वादामुळे मिळाले आहे. जेव्हा आपण मैदानात उतरतो तेव्हा देशवासीय काम सोडून आपल्यासाठी प्रार्थना करतात. आपण पदक जिंकले की, प्रत्येक देशवासीयाची छाती फुगते. हे माझ्या देशाचे भारताचे पदक आहे, त्याची काय किंमत असेल भाऊ!
साक्षी म्हणाली...साक्षी मलिक म्हणाली की, बाहुला-बाहुली खेळण्याच्या वयापासून आखाड्यातील मातीला मित्र बनविले. ज्याची किंमत १५ रुपये असल्याचे सांगितले जाते त्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. आपल्या देशातील चॅम्पियन्सची ही अवस्था केली जात आहे, ही शरमेची बाब आहे.