मेधा कुलकर्णी, शाम देशपांडे यांच्यात शाब्दीक चकमक
By admin | Published: July 12, 2015 11:56 PM
पुणे : आमदार मेधा कुलकर्णी व शिवसेनेचे शहर संघटक शाम देशपांडे यांच्यात कोथरुड येथील लक्ष्मीनगर परिसरात जोरदार शाब्दीक चकमक दोन दिवसांपूर्वी झाली. लक्ष्मीनगर येथील दारु गुत्त्यावर महापालिकेने की पोलीसांनी कारवाई करायची यावरून हा वाद कार्यकर्त्यांसमोर झाला.
पुणे : आमदार मेधा कुलकर्णी व शिवसेनेचे शहर संघटक शाम देशपांडे यांच्यात कोथरुड येथील लक्ष्मीनगर परिसरात जोरदार शाब्दीक चकमक दोन दिवसांपूर्वी झाली. लक्ष्मीनगर येथील दारु गुत्त्यावर महापालिकेने की पोलीसांनी कारवाई करायची यावरून हा वाद कार्यकर्त्यांसमोर झाला. राज्यातील सत्तेत भाजप व शिवसेना युतीचे सरकार असलेतरी त्यांच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवरही आपआपसात वाद आहेत. कोथरुड मतदार संघाच्या आमदार व नगरसेविका ही दोन्ही पदे मेधा कुलकर्णी यांच्याकडे आहेत. त्यामुळे स्थानिक विषयांत त्यांच्याकडून लक्ष दिले जाते. तर, शाम देशपांडे यांच्या पत्नी संगिता देशपांडे या स्थानिक नगरसेविका आहेत. कोथरुडमधील लक्ष्मीनगर भागातील दारु गुत्त्यावर कारवाई करण्याची मागणी कुलकर्णी यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांकडे केली. मात्र, अतिक्रमणऐवजी पोलीसांना कारवाई करण्यास सांगण्याचा आग्रह शाम देशपांडे यांनी धरला. त्यावरून कार्यकर्त्यांसमोरच दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचा व्हीडिओ व्हॉट्स ॲपवर फिरत असून, त्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. ------------------------------