मेडिसिन बायोटेकने कोव्हॅक्सिन स्वस्तात घेऊन महाग विकल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 05:58 AM2021-07-03T05:58:57+5:302021-07-03T05:59:25+5:30
काँग्रेसने विचारला प्रश्न : कोव्हॅक्सिन स्वस्तात घेऊन महाग विकल्याचा आरोप
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिनवरून ब्राझीलमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारांच्या आरोपानंतर आता भारतातही प्रश्न विचारले जात आहेत.
समाजमाध्यमे तसेच राजकीय पक्षही सरकारला प्रश्न विचारत आहेत की, भारत बायोटेक आणि सिंगापूरची मेडिसीन बायोटेक यांचा काय संबंध आहे? मेडिसीन बायोटेकने भारत बायोटेककडून स्वस्तात कोव्हॅक्सिन विकत घेऊन खूप महाग दराने विकली.
आयसीएमआरने लस बनवण्यासाठी करदात्यांचा पैसा भारत बायोटेकमध्ये गुंतवला होता. त्या बदल्यात निव्वळ नफ्याचा पाच टक्के आयसीएमआरला मिळणार होता. काँग्रेसने प्रश्न विचारला की, भारत बायोटेक आणि सिंगापूरची मेडिसीन बायोटेकचा मालक एकच आहे. त्याने नफा आयसीएमआरला न देण्याच्या हेतूने मेडिसीन बायोटेकलामध्ये आणून आयसीएमआरची फसवणूक केली.
गप्प का ?
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मोदी सरकारला विचारले की, देशाचे पंतप्रधान, आरोग्य मंत्री आणि सरकार आज मूग गिळून का बसले आहे? सरकारचे हे कर्तव्य आहे की त्याने मेडिसिन बायोटेक आणि भारत बायोटेकचा काय संबंध आहे, याचा शोध घ्यावा. हा प्रकार पीएमएलएचा आहे. जेव्हा सरकारने लसीच्या निर्यातीवर बंदी घातल्यावर हा करार केला जात होता, असेही श्रीनेत म्हणाल्या.