हैदराबाद : भारतातील ग्रामीण भागांत औषधांचा पुरवठा करण्यासाठी व हवामानाची माहिती देण्यासाठी पोस्ट खात्याच्या मनुष्यबळाचा उपयोग करण्यात येणार आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान व आरोग्य मंत्रालय याबाबत पोस्ट खात्याशी चर्चा करीत आहे.पोस्ट खात्याचे सचिव बी. व्ही. सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी विज्ञान मंत्रालय हवामानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट खात्याच्या मनुष्यबळाचा वापर करण्याची योजना तयार करीत आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाला आम्ही स्थानिक जलवायू परिस्थितीचा डेटा पुरवत आहोत. त्यांची इच्छा असल्यास ही माहिती आम्ही शेतकरी किंवा किनारपट्टी भागातील मच्छीमारांना पुरवू शकतो. याबाबतच्या प्रस्तावित यंत्रणेच्या तांत्रिक विवरणाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे व आर्थिक तपशिलाचे काम सुरू आहे. ही सुविधा पुढील दोन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे.देशाच्या सुदूर व दुर्गम भागांत औषधांचा पुरवठा पोस्ट खात्याने करावा, अशी आरोग्य मंत्रालयाची योजना आहे. याबाबत चर्चाही झाली आहे; परंतु या योजनेला अंतिम स्वरूप दिले गेलेले नाही. याबाबत अंतिम निर्णय लवकरच होईल, अशी अपेक्षा आहे. पोस्टाने कोणत्या प्रकारच्या औषधांचा पुरवठा करावा व कुठे करावा, याबाबत आरोग्य मंत्रालय अभ्यास करीत आहे.
पोस्टमन पोहोचवणार औषधी
By admin | Published: April 26, 2017 1:06 AM