मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्या उपचारखर्चापोटी विमा कंपन्यांकडे दाखल होणाऱ्या क्लेमच्या संख्येतही विक्रमी वाढ झाली आहे. एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत राज्यातील ७० हजार रुग्णांनी सुमारे ९०० कोटी रूपयांचे क्लेम दाखल केले होते. मात्र, सप्टेंबर या एका महिन्यात तब्बल ६५ हजार रुग्णांनी ८१० कोटींच्या उपचारखर्चाचा परतावा मिळण्यासाठी दावे दाखल केले.
देशात २६ लाख ६१ हजार रुग्ण हे सप्टेंबरमध्ये आढळले. तर, या महिन्यात ३३ हजार ३९० रुग्णांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी चिंताजनक असून विमा कंपन्यांचा घोरही त्यामुळे वाढला आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिलकडील आकडेवारीनुसार ३० सप्टेंबरपर्यंत देशभरातून तीन लाख १८ हजार रुग्णांनी आरोग्य विम्यासाठी चार हजार ८८० कोटींचे क्लेम सादर केले. त्यापैकी एक लाख ९७ हजार रुग्णांचे दावे मंजूर झाले असून ती रक्कम १९६४ कोटी आहे.आॅगस्टअखेरीस दावे दाखल करणाºया रुग्णांची संख्या एक लाख ७९ हजार होती. त्यांचे दावे दोन हजार ७०० कोटींचे होते. सप्टेंबरमध्ये देशभरातून दोन लाख १९ हजार रुग्णांचे क्लेम दाखल झाले असून ती रक्कम २१८० कोटी आहे. एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत दाखल झालेल्या दाव्यांपेक्षा सप्टेंबरमधील संख्या जास्त आहे.महाराष्ट्रातील क्लेम ४२ टक्केमहाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनारुग्ण असल्याने आरोग्य विम्यासाठी दाखल होणारे सर्वाधिक क्लेमही महाराष्ट्रातील आहेत. देशातीलतीन लाख १८ हजारांपैकी एक लाख३५ हजार म्हणजेच ४२ टक्केक्लेम महाराष्ट्रातून दाखल झाले. त्याखालोखाल तामिळनाडू (३२,८३०) आणि गुजरात (२७,९१३) या राज्यांचा क्रमांक लागतो.