नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानामुळे एका तरुण इंजिनिअरचं नशीब बदललं आहे. आत्मनिर्भरपासून प्रेरणा घेऊन तरुण महिन्याला लाखो रुपये कमावतो आहे. आसिफ असं या मेरठमधील इंजिनिअरचं नाव असून त्याने कोरोनाच्या संकटात एक स्टार्टअप तयार केलं आहे. ज्याच्या माध्यमातून त्याला महिन्याला लाखोंची कमाई करता येते. यासोबतच त्याने अनेकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. आसिफने एक अनोखा कूलर तयार केला आहे जो आरओचे पाणीही देऊ शकतो.
आसिफने केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेतला आणि आपला रोजगार सुरू केला आहे. विशेष म्हणजे त्याने 20 हून अधिक लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर घोषणेनंतर अनेक तरुणांनी प्रेरणा घेतली आहे. आसिफनेही तसाच प्रयत्न केला आणि त्याला यश आले आहे. याच दरम्यान त्याने चालतं फिरतं जिम तयार केलं आणि त्याचं पेटंटही केलं आहे. बीटेक, एमटेकपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या आसिफने आपला डबल विन्डो कूलरचा प्रोजेक्ट तयार केला आणि पहिल्यांदा तो भारत सरकारच्या स्टार्ट अप इंडियाच्या वेबसाइटवर अपलोड केला.
स्टार्ट अप इंडिया योजनेमुळे जीवनात झाला मोठा बदल
स्टार्ट अप इंडिया योजनेमुळे जीवनात मोठा बदल झाल्याची माहिती आसिफने दिली आहे. कोरोनाच्या संकटात त्याने आपल्या कल्पनेचं संधीत रुपांतर केलं. केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया योजनामुळे आसिफचं जीवन बदललं आहे. लॉकडाऊनमुळे जेव्हा सर्वचजण घरात होते, त्या काळात तो केवळ घरात थांबला नाही, तर त्याने वेळेचा सदुपयोग केला. यादरम्यान असा कूलर तयार केला आहे. तो कूलर केवळ थंड हवाच देत नाही तर आरओचं पाणीही देतो.
कोरोनाच्या संकटात 20 जणांना दिला रोजगार
आसिफने जिल्हा उद्योग केंद्राकडून माहिती मिळवित डबल विन्डो कूलर तयार करण्याचा प्रकल्प वेबसाईटवर अपलोड केला आणि त्याचं पेटंट करवून घेतलं. बँक ऑफ बडोदाकडून 25 लाखांचा कर्ज घेत आणि आपला रोजगार सुरू केला. सध्याच्या दिवसात आसिफने 20 बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. याशिवाय त्याने 7 नवे प्रकल्प सुरू केले आहे. आसिफच्या कामाचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"निवडणुकीच्या फायद्यासाठी स्टार सुशांतसिंहला भाजपाने केलं 'बिहारी अभिनेता", काँग्रेसचं टीकास्त्र
CoronaVirus News : चीनने कशी केली कोरोनावर मात?, WHO ने जगाला सांगितलं सत्य
CoronaVirus News : "प्लाझ्मा थेरपी कोरोना रुग्णाचा मृत्यू रोखू शकत नाही", रिसर्चमधून खुलासा
"21 दिवसांत कोरोना संपवण्याचं वचन होतं पण कोट्यवधी रोजगार, छोटे उद्योग संपवण्यात आले"
दिलदार सुपरहिरो! सिम कार्डवर सोनू सूदचं चित्र, अभिनेत्याने दिली भन्नाट रिअॅक्शन