शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

Women's Day 2018: 'त्या' बनवतात दैनंदिन वापरासाठीची अॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 9:25 AM

तंत्रज्ञानातही आज महिला मागे नाहीत.

आज जागतिक महिला दिन. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या महिलांचा गौरव नेहमी होताना आपण पाहिला आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री आज समाजात वावरताना दिसते. तंत्रज्ञानातही आज महिला मागे नाहीत. आपल्या मोबाइलमध्ये असणारे व आपल्याला रोजच्या वापरात उपयुक्त ठरणारे अॅप्लिकेशन तयार करणाऱ्याही काही माहिला आहेत ज्यांच्या कामामुळे आपण मोबाइलमधील हे अॅप्लिकेशन सहजतेने वापरतो. आज जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊया या महिलांबद्दल..

- हॅलो इंग्लिश: लर्न इंग्लिशइंग्रजी भाषा ही आजच्या काळाची गरज आहे. कुठल्याही क्षेत्रात आज गेलात तर इंग्रजी भाषा बोलली जाते. म्हणून इंग्रजी समजणही तितकंच महत्त्वाचं आहे. आजही अशी अनेक लोक आहेत ज्यांना इंग्रजी नीट बोलता येत नाही तसंच समजतही नाही. म्हणून यंग इंडियाची गरज लक्षात घेता प्रन्शू पटणी यांनी इंग्रजी शिकविणार अॅप डेव्हलप केलं. कुठल्याही वयाच्या व्यक्तीला इंग्रजी भाषेतील थोडफार तरी कळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रन्शू यांनी हे अॅप डेव्हलप केलं. मोबाइलच्या माध्यमातून येत्या काळात सगळ्यांनाच इंग्रजी समजावं, असा त्यांचा मानस आहे. इंटरनेटचा फार वापर करता न येणाऱ्यांसाठीही हे अॅप महत्त्वाचं आहे. 

- ओबीनो, हेल्थ अॅण्ड वेट लॉस कोचवजन कमी करण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. फार मेहनत करूनही वजन कमी न झाल्याने सगळेच चिंतेत असतात. विशेष म्हणजे बाळंतपणात व बाळंतपणानंतर वाढलेलं वजन घटवणं ही महिलांसमोर मोठी समस्या असते. असाच अनुभव होता ओबीनो हे अॅप डेव्हलप करणाऱ्या रितू श्रीवास्तव यांचा. पहिल्या मुलीला जन्म दिल्यावर वाढलेलं वजन घटवणं हा रितू यांच्या समोरील मोठा पेच होता. खूप मेहनत करून त्यांनी वजन तर घटवलं पण त्यानंतर ओबीनो या अॅपची निर्मिती केली. वजन कमी करण्यासाठीच्या सोप्या टीप्स देणारं हे अॅप आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून मिळणाऱ्या टीप्समुळे वजन घटतं हे लोकांना समजवून देणं मोठी समस्या होती. पण सगळी आव्हान सांभाळत रितू यांनी हे काम पूर्ण केलं. रितू यांनी त्यांच्या गुरू कांचन कुमार यांच्या मदतीने ओबीनो अॅप डेव्हलप केलं. 

- हॅबिटिका: गेमिफाय युअर टास्कतुम्ही एकाच खूप मेहनत करून काम करू शकता आणि खेळूही शकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे हॅबिटिका हे अॅप आहे. या अॅपमध्ये टास्क मॅनेजमेंट आहे. ज्यांना व्यक्तीमत्त्व विकासावर भर देत विविध आव्हान पेलायला आवडतात व तेही खेळाच्या माध्यमातून अशांसाठी हे अॅप आहे. सिएना सेल्सी आणि विकी हसू यांनी या अॅपची निर्मिती केलीये. या दोघांनी आपापलं स्कील वापरू हे अॅप तयार केलं आहे. 

- कॅनवा- फ्री फोटो एडिटर अॅण्ड ग्राफिक डिझाइन टूलडिझाइन करणं किंवा ग्राफिक करणं हे प्रत्येकाला सोप जावं व अगदी सोप्या पद्धतीने ते करता यावं हा विचार करून मेलानी पेर्किन्स यांनी कॅनवाची निर्मिती केली. कॉलेजमध्ये असताना मेलानी त्यांच्या वर्गातील मुलांना सॉफ्टवेअर डिझाइन करताना पाहायच्या. त्यावेळी डिझाइन करणं, सोपं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हाच विचार करून मेलानी यांनी कॅनवा डेव्हलप केलं. कॅनवा हे अॅप लॉन्च करण्यासाठी मेलांनी यांनी आधी फ्युजन बूक व इयरबूक डिझाइन लॉन्च करून तपासणी केली व त्यानंतर कॅनवा तयार केलं. कॅनवाच्या माध्यमातून सुंदर डिझाइन, फोटो एडिटिंग सहजतेने करता येतं. 

- पिरिअड टॅकर क्लू काही खासगी अनुभवानंतर हा अॅपची निर्मिती झाली. डॅनिश इंटरप्रिनियर इदा टीन यांनी हे अॅप तयार केलं आहे. बर्थ कंट्रोल पिल्स इदा यांच्यासाठी फायद्याच्या ठरत नव्हत्या. म्हणूनच दैनदिनी तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी हे अॅप तयार केलं. प्रत्येक स्त्रीला तिच्या मासिक पाळीतील समस्या व इतर आरोग्याच्या समस्या डिजिटल पद्धतीने पाहता याव्यात यासाठी हे अॅप तयार झालं. 

- किचर स्टोरीज- रेसिपी, बेकिंग, हेल्थी कुकिंगस्वयंपाक करणं ही एक कला आहे. म्हणून ती कला प्रत्येकाला जोपासला यावी यासाठी तयार झालेलं हे अॅप आहे. ज्यांना स्वयंपाक येत नाही अशांना व्हिडीओ व फोटोच्या माध्यमातून शिकता यावं, यासाठी हे अॅप तयार झालं. सोशल मीडियावर आधी चांगल्या क्वालिटीचे व्हिडीओ व फोटो नसल्याने ती संधी साधत मेंटिंग गो आणि वेरेना हुबर्ट्ज या दोघींनी कुकिंग स्पेशल अॅप तयार केलं. 

- सिंपल हॅबिट मेडिटेशनआजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी काही मिनिटांचा वेळ देणं कठीण आहे. रोजच्या कामाशिवाय काही जणांच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्यामुळे ती व्यक्ती त्या घटनेच्या विचारात असते. त्या घटनेच्या मानसिक त्रासाला सामोरी जाते. युन्हा किम या महिलेने या अॅपची निर्मिती केली. व्यवसाय करण्याच्या विचारात असणाऱ्या युन्हा किम यांनी जेव्हा त्यांच्या व्यवसायाची सुरूवात केली तेव्हा 100 तास काम करत होत्या. त्यामुळे त्यांना झोप मिळणं कठीण होतं. स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी त्यांनी मेडिटेशन करण्याचा निर्णय घेतला. मेडिटेशनमुळे त्यांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले त्यांनी पाहिले. आपल्याला जो अनुभव आला तो प्रत्येकाला मिळावा यासाठी त्यांनी मेडिटेशन अॅप विकसित केलं. व्यस्त जीवनशैली असणाऱ्या लोकांना एका मिनिटाच्या आत रिलॅक्स होता यावं, यापद्धतीने या अॅपची आखणी केली.  

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८