वारसांना नोकरी मिळण्यासंदर्भात बैठक
By admin | Published: February 07, 2016 10:46 PM
जळगाव : महानगरपालिकेतील कर्मचार्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना अनुकंप तत्त्वावर नोकरी मिळण्याची मागणी प्रलंबित असून या संदर्भात रविवारी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बैठक झाली. सोमवारी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
जळगाव : महानगरपालिकेतील कर्मचार्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना अनुकंप तत्त्वावर नोकरी मिळण्याची मागणी प्रलंबित असून या संदर्भात रविवारी श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बैठक झाली. सोमवारी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटना व जळगाव जागृत मंच यांनी याविषयी आवाज उठविला असून रविवारी या प्रकरणातील वारसांची बैठक घेण्यात आली. यामध्ये ५५ वारसांचे अर्ज प्रलंबित असून या बाबत मनपाकडे पैसे नाही, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे कारण सांगून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. या बैठकीत शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल नाटेकर व जळगाव जागृत मंचचे अध्यक्ष शिवराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. या संदर्भात सोमवारी संध्याकाळी पाच वाजता वारसांचे कुटुंबिय मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेणार आहे.