पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच : प्रकृती बिघडल्याने सतरा आंदोलक रुग्णालयातनाशिक : आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील तासिका मानधन कर्मचारी व कंत्राटी शिक्षण कर्मचारी संघटनेच्या वतीने बुधवार (दि़२५) सुरू करण्यात आलेले आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच होते़ यातील सतरा आंदोलकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, शासनाने आंदोलनाची दखल घेतली असून, मंगळवारी मंत्रालयात आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चेसाठी बोलविण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्ते संदीप भाबड यांनी दिली़आदिवासी विकास विभागाच्या दुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळेत तुटपुंज्या मानधनावर काम करणारे हे कंत्राटी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत़ सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी त्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून, रविवारी पावसातही त्यांचे आंदोलन सुरूच होते़ या आंदोलनास पाच दिवस उलटून गेले असून, २३ आंदोलकांची प्रकृती बिघडली, तर यातील सतरा आंदोलकांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे़दरम्यान, मंगळवारी मंत्रालयात आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात येणार आहे़ या शिष्टमंडळातील संदीप भाबड, पंडित भाबड, रितेश ठाकूर, एस़ पी़ गावित, बबिता पाडवी, कमलाकर पाटील, केशव ठाकरे यांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)--कोट--मंत्रालयात मंगळवारी चर्चादुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये तुटपुंज्या मानधनावर काम करणारे आम्ही कंत्राटी कर्मचारी असून, पहिल्या दिवसापासून काम करणार्या सर्वांना सेवेत घेण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत़ यासाठी मंगळवारी आमच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविण्यात आले आहे़- संदीप भाबड, आंदोलक़--इन्फो--उपोषणकर्ते रुग्णालयातकांताबाई धांडे, जमुनाबाई सीताराम, कुंडलीक गोडे, जगदीश शेलेकर, जगन दारिंबे, धनसिंग वसावे, विजय खरात, रमेश कुडसेम, मुकेश पटेल, सजन चव्हाण, अशोक पोटेकर, आशाबाई पावरा, जिभाऊ कुवर, श्यामराव चौधरी, भास्कर पाटील, सुधाकर भोयर, रमेश पराड या आंदोलकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़फोटो:- ०१ पीएचएमआर १०६सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी आदिवासी विकास भवनमध्ये उपोषणासाठी बसलेले शासकीय आश्रमशाळांमधील तासिका मानधन कर्मचारी व कंत्राटी शिक्षण कर्मचारी़
आश्रमशाळा कर्मचारी उपोषणप्रश्नी मंगळवारी मंत्रालयात बैठक
By admin | Published: March 01, 2015 10:10 PM