भर सभेत केळी उत्पादकाचा संताप बाजार समितीची सभा गाजली : निवडणूक लढविलेले आमंत्रित सदस्य झाले कसे? संचालकाचा सवाल
By admin | Published: March 23, 2016 12:11 AM
जळगाव- बाजार समितीची मासिक सभा मंगळवारी सकाळी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात झाली. ही सभा सुरू असतानाच भोकर येथील शेतकरी छोटू पाटील यांनी केळीची प्रचलित दरापेक्षा कमी दरात केली जाणारी खरेदी..., व्यापार्यांकडून होणारी फसवणूक व बाजार समितीची बघ्याची भूमिका यासंबंधीचे मुद्दे मांडून संपात व्यक्त केला.
जळगाव- बाजार समितीची मासिक सभा मंगळवारी सकाळी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात झाली. ही सभा सुरू असतानाच भोकर येथील शेतकरी छोटू पाटील यांनी केळीची प्रचलित दरापेक्षा कमी दरात केली जाणारी खरेदी..., व्यापार्यांकडून होणारी फसवणूक व बाजार समितीची बघ्याची भूमिका यासंबंधीचे मुद्दे मांडून संपात व्यक्त केला. केळी उत्पादकांना व्यापारी लुटत आहे... त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे..., पण बाजार समिती व शेतकरी प्रतिनिधी काही करायला तयार नाहीत, असेही शेतकरी पाटील म्हणाले. उपसभापती कैलास चौधरी व संचालक विमलबाई भंगाळे यांनीही केळी उत्पादकांचे प्रश्न सभेत मांडून यासंदर्भात बाजार समितीने कठोर भूमिका घेतली पाहीजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षस्थानी सभापती प्रकाश नारखेडे होते. उपसभापती कैलास चौधरी, संचालक लक्ष्मण पाटील (लकी टेलर), अनिल भोळे, भरत बोरसे, सिंधूबाई पाटील, विमलबाई भंगाळे, सरला पाटील, प्रभाकर पवार, मनोहर पाटील, वसंत भालेराव, प्रभाकर सोनवणे, सुरेश पाटील, शशिकांत बियाणी, नितीन बेहेडे आदी उपस्थित होते. केळी व्यापार्यांना नोटिसाकेळी प्रश्नावरून संचालकांच्या सभेत संताप करणारे छोटू पाटील यांना नंतर संचालकांनी समजूत काढून शांत केले. केळीची प्रचलित दरापेक्षा कमी दरात खरेदी करणार्या १६ व्यापार्यांना नोटिसा देण्याचा निर्णय झाला. तसेच या व्यापार्यांसोबत लवकरच बैठक घेण्याचेही ठरले. उपसभापतींचे अनेक प्रश्नव्यापारी ५३० रुपये दर नवतीसाठी जाहीर करतात. केळीची खरेदी मात्र ३०० रुपये प्रतिक्विंटल दरात करतात. ज्या दरात ते खरेदी करतात तेच दर जाहीर करावेत... तीच माहिती वृत्तपत्रात प्रसिद्धीस द्यावी... पण ते जे दर जाहीर करतात त्याचा उपयोग ते खरेदी केलेली केळी विक्रीसाठी करतात. म्हणजेच खरेदी करताना कमी दर शेतकर्याला द्यायचे व पुढे त्याची दिल्ली व इतरत्र विक्री करतना जे दर जाहीर केले त्याचा आधार घेऊन नफा मिळवतात.., असा आरोप उपसभापती चौधरी यांनी केला. आमंत्रित सदस्यांना टोलाआमंत्रित सदस्य विलास चौधरी व ज्ञानेश्वर नाईक उपस्थित होते. नाईक यांनी विषय पत्रिका व्यवस्थित मिळालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली. त्यावर एका संचालकाने जी व्यक्ती निवडणूक लढविते.. ती त्याच संस्थेत आमंत्रित संचालक म्हणून नियुक्त करता येत नाही... कायद्याचेच बोलायचे झाले तर आपल्या संचालकपदावरही चर्चा करावी लागेल..., असा टोला लगावला.