नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमध्ये आज झालेली बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही बैठक सकारात्मक झाल्याचे सांगितले. मात्र शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारसोबत ३ डिसेंबर रोजी चर्चेची पुढची फेरी होणार असल्याचे सांगितले.केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषि कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बरेच दिवस तिढा कायम राहिल्यानंतर आज शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार चर्चेसाठी समोरासमोर आले. दिल्लीतील विज्ञान भवन येथे आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमधील ही बैठक सुमारे चार तास चालली. मात्र त्यातून कुठलाही समाधानकारक तोडगा निघाला नाही. आता ३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा बैठक होणार आहे.बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळातील सदस्य चंदा सिंह यांनी सांगितले की, कृषी कायद्याविरोधात आमचे आंदोलन सुरू राहील. आम्ही केंद्र सरकारकडून काही ना काही परत घेऊन जाणारच. मग ती गोळी असेल किंवा अन्य काही. आम्ही पुन्हा एकदा चर्चेसाठी जाणार आहोत.
शेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठक अनिर्णित, आंदोलन सुरूच राहणार
By बाळकृष्ण परब | Published: December 01, 2020 7:58 PM
Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमध्ये आज झालेली बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली.
ठळक मुद्देकेंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही बैठक सकारात्मक झाल्याचे सांगितले शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केलेआंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये ३ डिसेंबर रोजी होणार चर्चेची पुढची फेरी