शरद पवारांनी दिल्लीत बोलविलेली बैठक बेकायदेशीर; अजित पवार गटाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 04:24 PM2023-07-06T16:24:47+5:302023-07-06T16:25:47+5:30
दिल्लीतील बैठकीला जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी पक्षातील सध्याच्या बंडाळीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले आहे.
दिल्लीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशपातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला देशभरातील राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. या बैठकीला अजित पवार गटाने बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीतील बैठकीला जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी पक्षातील सध्याच्या बंडाळीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले आहे.
अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरही दावा केला आहे. तसे कागदपत्र त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहेत. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यावरही अजित पवार यांनी दावा केला आहे. शरद पवार यांची अध्यक्ष पदी निवड बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार हे खरे राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करतात आणि निवडणूक आयोगाने वाद मिटवल्याशिवाय पक्षातील कोणत्याही व्यक्तीला बैठक बोलावण्याचा अधिकार नाही, असे अजित पवार गटाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.