शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

चांदोमामाशी आज गळाभेट! चंद्रयान-३चे आज 'सॉफ्ट लँडिंग'; ISRO घडविणार इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 5:38 AM

ऐतिहासिक क्षणाविषयी साऱ्या जगात प्रचंड उत्सुकता

बंगळुरू : लहानपणापासून ज्या चांदोमामाच्या गोष्टी, गाणी आपण ऐकत आलो, त्या चंद्राशी आता भारताची प्रत्यक्ष गळाभेट होण्याचा क्षण जवळ आला असून भारताचे ‘प्रग्यान’ (रोव्हर) आणि विक्रम (लँडर) हे दोघे बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. भारताच्या  चंद्रयान-३च्या चंद्रावरील ऐतिहासिक लँडिंगकडे साऱ्या जगात विलक्षण उत्सुकता निर्माण झाली आहे. भारताच्या चंद्रमोहिमेला यश मिळू दे अशी सदिच्छा असंख्य लोक व्यक्त करत आहेत. या मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयानाचे लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरेल.

चंद्रयान-३वरील विक्रम लंँडर, प्रग्यान रोव्हर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील त्यावेळी प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटणार आहे. चंद्रयान मोहिमेद्वारे भारताने जे स्वप्न पाहिले त्याची पूर्तता उद्या होणार असून सगळेजण त्या क्षणाकडे डोळे लावून बसले आहेत. जर चंद्रयान-३मधील रोव्हरचे चंद्राच्या पृष्ठभागावर नीट लँडिंग झाले तर चंद्रावर अशा प्रकारची कामगिरी करण्याची क्षमता असलेला भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. यापूर्वी अशी भव्य कामगिरी अमेरिका, चीन, रशिया यांनीच करून दाखविली होती. (वृत्तसंस्था)

  1. रफ ब्रेकिंग फेज - २५x१३४ कि.मी. कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा ३० कि.मी. उंचीवर असेल तेव्हापासून ते उतरण्याच्या जागेकडे जाण्यासाठी चंद्राभोवती ७१३ किमी अंतर सरकत जाईल. त्याचा क्षितीज समांतर वेग १.६८ कि.मी. प्रति सेकंदवरून ०.२ कि.मी. प्रति सेकंद इतका कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील १२ पैकी ४ इंजिन वापरून यान ३० किमीउंची वरून ७.४२ किमी उंचीवर येईल. ६९० सेकंदांत हे होईल.  
  2. अल्टिट्यूड होल्ड फेज - विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे टिपेल. भागाच्या छायाचित्रांशी तुलना करेल. हा टप्पा १० सेकंदांचा असेल. एवढ्या वेळेत ते आडव्याचे उभे केले जाईल. चंद्राभोवती ३.४८ किमी सरकेल आणि ७.४२ किमी उंचीवरून ते ६.८ किमी उंचीवर आणण्यात येईल. या काळात त्याचा वेगही कमी करण्यात येईल. 
  3. फाइन ब्रेकिंग फेज - हा टप्पा १७५ सेकंदांचा आहे. या काळात हे यान २८.५२ किमी लँडिंगच्या जागेकडे सरकत जाईल. तसेच विक्रम लँडरची स्थिती यावेळी व्हर्टिकल असेल. त्याची उंची ६.८ किमीवरून चंदाच्या पृष्ठभागापासून ८०० ते १००० मीटर उंचीवर आणले जाईल. विक्रम लँडरचे सेन्सर सुरू करून पृष्ठभागाचे विश्लेषण केले जाईल. उतरण्यायोग्य जमीन तपासली जाईल. त्यासाठी विशेष कॅमेरा वापरला जाईल. जागा योग्य नसेल तर त्याच भागात १५० मीटर आजूबाजूस जागेचा शोध घेतला जाईल.  
  4. टर्मिनल डिसेंट फेज - विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून १५० मीटर उंचीवर असेल. लँडरला सर्व गोष्टी सुरळीत आढळल्या तर विक्रम लँडर पुढच्या ७३ सेकंदांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि भारताचे स्वप्न पूर्ण होईल.

 

  • लँडिंग : सायंकाळी ५:४५ पासून - १८ मिनिटांचा थरार. अत्यंत कठीण टप्पे, समजून घ्या सोप्या शब्दांत
  • उतरण्याची वेळ - सायं. ६:०४ वा.
  • कुठे उतरणार? - दक्षिण ध्रुवावर
  • कसे करणार लँडिंग? - लँडिंग साइट तपासून निर्णय
  • कुठे पाहता येईल? इस्रोच्या वेबसाइटवर - www.isro.gov.in/LIVE_telecast_of_Soft_landing.html
  • अडचण आल्यास? - इस्रोकडे प्लॅन बी

इस्रोचा प्लॅन बी तयार; ...तर लँडिंग २७ ऑगस्टला

चंद्रयान-३मधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू असल्याबद्दल इस्रोकडून वारंवार तपासणी केली जात आहे. या यंत्रणा तसेच चंद्रावरील वातावरण या सर्व गोष्टींमध्ये अपेक्षेपेक्षा काही वेगळे बदल जाणवले तर इस्रोने चंद्रयान-३चे लँडिंग २३ ऑगस्टऐवजी २७ ऑगस्टला करण्याचा पर्यायही ठेवला आहे.  यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतरही हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे इस्रोने म्हटले आहे. 

लँडिंगनंतर काय होणार?

चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरल्यानंतर तो अधिक सक्रिय होईल. त्याचे रॅम्प उघडून त्यातून प्रग्यान रोव्हर चंद्रावर उतरेल. त्यानंतर विक्रम लँडर व प्रग्यान रोव्हर परस्परांची छायाचित्रे टिपणार असून ती पृथ्वीवर पाठवतील.

ज्यांनी दाखवले स्वप्न, त्यांच्या नावाचे ‘विक्रम’ चंद्रावर उतरणार

पं. जवाहरलाल नेहरू आणि संशोधक डॉ. विक्रम साराभाई यांच्या संकल्पनेतून भारत सरकारने अवकाश संशोधनासाठी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची १९६२ मध्ये स्थापना केली. त्यातूनच पुढे १५ ऑगस्ट १९६९ रोजी इस्रोची स्थापना झाली. तेव्हाचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न आज पूर्ण होईल.

टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3isroइस्रोIndiaभारत