नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. गहलोत यांच्या जागी हे पद कुणाला मिळणार हे अजुनही उघड झालेले नाही. मुख्यमंत्री अशोक गहलोत काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार आहे.या संदर्भात आज गहलोत यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे, या बैठकीत आज मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलण्यात येत आहे.
या बैठकीत आमदारांची मत जाणून घेण्यात येणार आहे.काँग्रेसचे ज्येष्ठनेते मल्लिकार्जुन खरगे,अजय माकन हे बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांचे नाव आहे, यावर आमदारांचे मत जाणून घेण्यात येणार आहे.
काँग्रेसमध्ये सध्या अध्यक्षपदाची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. काँग्रेसचे पुढचे अध्यक्ष गहलोत होणार यावर काँग्रसेच्या नेत्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची सध्या चर्चा सुरू आहे.
गहलोत मुख्यमंत्रिपद कधी साेडणार? राजीनाम्याबाबत काॅंग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह
सचिन पायलट यांचे विरोधकांनी केले समर्थन
मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गहलोत यांच्या बाजूच्या आमदारांनी पायलट यांना समर्थन दिले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजस्थानच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ट्विट करून बैठकीची माहिती दिली आहे. 'माननीय काँग्रेस अध्यक्षांनी २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या राजस्थान विधानसभेच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी अजय माकन यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, अशी माहिती त्यांनी ट्विटवरुन दिली आहे.