रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात आज बैठक मनपा: सामाजिक संस्था निमंत्रित
By admin | Published: May 12, 2016 10:54 PM
जळगाव : शहरासाठी रेन वॉटर हावेर्ेस्टिंग संकल्पना यशस्वीपणे राबविण्यासाठी महापालिकेतर्फे जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत एक बैठक १३ रोजी आयोजित केली असून शहरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
जळगाव : शहरासाठी रेन वॉटर हावेर्ेस्टिंग संकल्पना यशस्वीपणे राबविण्यासाठी महापालिकेतर्फे जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत एक बैठक १३ रोजी आयोजित केली असून शहरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. शहरात भूजल पातळी वाढविण्यासाठी एक अभियान महापालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे. यावर्षी शहरात पाणी टंचाई नाही मात्र गेल्या काही वर्षात भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे लक्षात आले आहे. त्यासाठी शहरात बांधण्यात येत असलेल्या इमारती तसेच बांधलेल्या इमारती, शासकीय इमारती, शैक्षणिक संस्था आदी उपक्रमांच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविण्याचे नियोजित आहे. यासाठी शहरातील उद्योजक, मेडिकल असोसिएशन, रोटरी परिवार, सामाजिक क्षेत्रात काम करणार्या संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक महापालिकेत १३ रोजी दुपारी ४ वाजता मनपाच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात आयोजिण्यात आली आहे. महापालिकेकडून या संस्थांना बैठकीस उपस्थितीबाबत पत्रही देण्यात आले आहे. बैठकीस महापौर नितीन ला, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, उपमहापौर ललित कोल्हे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.