शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Meghalaya Election results 2018: मेघालय 'हात'चं जाऊ न देण्यासाठी काँग्रेसचे दूत रवाना, भाजपचे 'चाणक्य'ही लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 16:54 IST

राष्ट्रीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेले हे दोन्ही नेते मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहतील. 

नवी दिल्ली: ईशान्य भारतातील तीन महत्त्वपूर्ण राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यापैकी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपाला मोठे यश मिळाले असले तरी मेघालयात मात्र काँग्रेसने आपला किल्ला शाबूत राखला आहे. याठिकाणी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, परंतु त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता मेघालयात सत्तेचा सोपान चढण्यासाठी आपल्या दोन चाणक्यांना कामाला लावले आहे. मेघालयात काँग्रेस सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अहमद पटेल आणि कमल नाथ हे लगेचच शिलाँगसाठी रवाना झाले. राष्ट्रीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेले हे दोन्ही नेते मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहतील. तत्पूर्वी भाजपानेही कोणत्याही परिस्थिती काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहचून देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. मेघालय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कोहली यांनी म्हटले की, इतर पक्षाची कामगिरी पाहता यंदाच्या निवडणुकीत जनमत काँग्रेसविरोधी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी करू, असे कोहली यांनी म्हटले. तर भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीदेखील मेघालयमध्ये बिगरकाँग्रेसी सरकार पाहायला मिळेल, असे संकेत दिले. हेमंत बिश्व शर्मा हे लवकरच मेघालयमध्ये जातील, असे राम माधव यांनी सांगितले. यापूर्वी मणिपूर आणि गोव्यातही भाजपाच्या निकालानंतरच्या मॅनेजमेंटमुळे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे मेघालयमध्येही असाचा काही चमत्कार पाहायला मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पुन्हा मणिपूर आणि गोव्यासारखी परिस्थिती ओढावणार नाही, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अहमद पटेल आणि कमल नाथ आज दुपारी विद्यमान मुख्यमंत्री मुकूल संगमा यांची भेट घेणार असल्याचे कळते. 

टॅग्स :Northeast Election Results 2018ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018Meghalaya Election Results 2018मेघालय निवडणूक निकाल 2018