ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २४ - मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर पीपल्स डेमोक्रॉटीक पार्टीच्या अध्यक्षपदी व मुख्यमंत्री पदीच्या उमेदवार म्हणून मेहबुबा मुफ्ती यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या आहेत. आज पार्टी अध्यक्षांच्या निवडीसाठी मेहबुबा मुफ्तीयांच्या घरी पार्टीच्या सर्व विदेयकांची बैठक झाली. या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
त्याचप्रमाणे पीडीपी कडून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून पार्टी अध्यक्षपदी मेहबुबा मुफ्तीयांची निवड केल्याची माहीती मुझफीर बेंइग यांनी दिली आहे. भाजपा आणि पीडीपी मिळून सत्ता स्थापण करणार आहेत. मेहबूबा मुफ्ती २९ मार्च रोजी शपथ घेण्याची शक्यता, पक्षातील सदस्यांनी मेहबूबा यांना विधीमंडळाच्या नेता म्हणून निवडलं आहे.दोन मुलींची आई असलेल्या ५६ वर्षीय मेहबुबा या पीडीपीच्या अध्यक्ष म्हणून आज निवड झाली आहे. त्या जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील.
सर्वोनमते मला पार्टीच्या अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केल्याबद्दल पार्टीच्या सर्व विधेयकांचे आणि कार्यकर्त्यांचे महबूबा मुफ्ती यांनी आभार मानले आहेत. उद्या त्या सरकार स्थापनेसाठी श्रीनगर राज्यपाल एन.ए, वोहरा यांची यांची राजभवन येथे भेट घेणार आहेत. त्यावेळी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सत शर्मोही उपस्थीत पाहणार आहेत. भाजपा आण पीडीपी मिळून सरकार स्थापण करणार असल्याचे स्पठ झाले आहे.
मुफ्ती यांनी २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. या भेटीत सकारात्मक बोलणी झाल्याचं त्यांनी सांगीतले होते.पुर्व मुखमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर ८ जानेवारी पासून राज्यात राज्यपाल शासन सुरु आहे.