श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी दहशतवादी सलाहुद्दीनच्या मुलांना सरकारी नोकरीवरुन काढून टाकल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. वडिलाच्या वाईट कामाची शिक्षा मुलांना कशी देता ? असा प्रश्न त्यांनी विचारला. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
तपासाशिवाय सलाहुद्दीनच्या मुलांवर कारवाईसरकारने हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी सलाहुद्दीनच्या दोन मुलांसह 11 जणांना सरकारी नोकरीवरुन काढून टाकले आहे. त्यांच्यावर सरकारी नोकरी करत असताना दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. यावर बोलताना मुफ्ती म्हणाल्या की, कुठल्याही तपासाशिवाय सलाहुद्दीनच्या मुलांवर ही कारवाई करण्यात आलीये. वडिलाने केलेल्या वाईट कामाची शिक्षा मुलांना का देता ? असा सवालही त्यांनी विचारा.
कलम 370 चा उल्लेखमुलाखतीदरम्यान महबूबा यांनी कलम 370 आणि 15अ चाही उल्लेख केला. या प्रकरणाचा संबंध त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्याशी जोडला. जेव्हा राम मंदिराचे प्रकरण कोर्टात होते, तेव्हा यासाठी लोक आवाज उठवायचे. मग मी कलम 370 साठी आवाज उठवल्यावर गुन्हेगार ठरवता, असे त्यांनी म्हटले. तसेच, 370 आणि 35अ परत आणण्यासाठी नेशनल कॉन्फ्रेंस आणि पीडीपीसोबत इतर पक्ष आल्याचेही त्या म्हणाल्या.