श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. इल्तिजा मुफ्ती हिला तिच्याच घरात नजरकैद करण्यात आले आहे.
वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमध्ये आपले आजोबा आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कब्रला भेट देण्यासाठी इल्तिजा मुफ्ती जात होती. मात्र, त्याचवेळी तिला ताब्यात घेण्यात आले. पण, पोलिसांनी याबाबतचा दावा फेटाळून लावला आहे.
दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने रद्द केले. हे कलम 370 रद्द करण्याआधी राज्यातील अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मेहबूबा मुफ्ती सुद्धा नजरकैदेत आहेत. तेव्हापासून मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळते.