नवी दिल्ली - देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी मेहूल चोकशी याची अँटिग्वामध्ये चौफेर कोंडी करण्यासाठी भारत सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी भारताच्या उच्चायुक्तांनी अँटिग्वा आणि बर्बुडाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. भारतीय उच्चायुक्तांनी अँटिग्वा आणि बर्बुडाच्या अधिकाऱ्यांना मेहूल चोकशीच्या उपस्थितीची लिखित किंवा मौखिक दुजोरा देण्याचे, त्याला ताब्यात घेऊन भू, जल किंवा हवाई कुठल्याही मार्गाने त्याच्या येण्याजाण्यावर बंदी घालण्यास सांगितले. भारतात सरकारी सूत्रांनी सांगितले की, आमच्या उच्चायुक्तांनी अँटिग्वा आणि बर्बुडा सरकारच्या उपायुक्त अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. आम्ही भारत आणि अँटिग्वा-बर्बुडाच्या सरकारांच्या उपायुक्त एजन्सींसोबत ताळमेळ ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच या प्रकरणावर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत.
मेहूल चोकशीची अँटिग्वामध्ये चौफेर कोंडी करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 4:53 PM