नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा करून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी मेहूल चोक्शी सध्या डोमिनिका देशाच्या ताब्यात आहे. त्याला डोमिनिकामधून भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मेहूल चोक्शीची पत्नी प्रीती मोहन हिने काही धक्कादायक दावे केले आहेत. मेहूल चोक्शीच्या जीवितास धोका असल्याची भीती तिने व्यक्त केली आहे. तसेच मेहूल चोक्शीसोबत डोमिनिकाच्या समुद्र किनाऱ्यावर यॉटमध्ये दिसलेली तरुणी आपल्या ओळखीची असल्याचेही तिने सांगितले आहे. (Mehul Chokshi's wife made a big secret statement about that Mystery Girl )बिझनेस स्टॅंडर्डला दिलेल्या मुलाखतीत प्रीती चोक्शीने सांगितले की, तिचे पती २३ मे रोजी संध्याकाळी भोजन घेण्यासाठी गेले होते. मात्र ते परत आले नाहीत. प्रीती चौक्शीने सांगितले की, मेहूल चोक्शला शोधण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर एक सल्लागार आणि आचाऱ्याला पाठवले मात्र काहीच माहिती न मिळाल्याने शेवटी पोलिसांशी संपर्क साधला. मेहूल चोक्शीच्या पत्नीला मिस्ट्री गर्ल बारबरा जेबरिकाबाबत विचारले असता तिने सांगितले की, जेबरिका ही गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अँटिगा येथे आली होती. ती या बेटावरील आमच्या दुसऱ्या घरातही आली आहे. तेथील शेफसोबत तिची मैत्री झाली होती.
दरम्यान, जेबरिका ही सेक्सी फिमेल फेटेल असल्याच्या आंतरराष्ट्रीय माध्यमातील दाव्यांचे प्रीती चोक्शीने खंडन केले आहे. बारबरा वेगळी दिसते. मात्र ती जशी दिसते तशी नाही आहे. तिच्याकडे एक चांगले शरीर असू शकते. ती गोष्ट नाहीये. पण हा फोटो तिचा नाही. प्रकृतीच्या समस्यांमुळे माझे पती मेहूल चोक्शी यांनी तीन वर्षांपासून हे बेट सोडलेले नाही. त्यांना वकिलांना भेटण्याची किंवा वैद्यकीय सुविधा घेण्याचीही परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत मला त्यांना ठार मारले जाईल, अशी भीती मला वाटते. प्रसारमाध्यमे म्हणताहेत की चोक्शी फरार झाला आहे. मात्र भारतीय घटनेतील कलम ९ अनुसार मेहूल चोक्शी हा आता भारतीय नागरिक नाही. त्याने २०१७ मध्ये अँटिगाचे नागरिकत्व स्वीकारले. त्याच्यासाठी जगातील ही सर्वात सुरक्षित जागा आहे. दरम्यान, मेहूल चोक्शीबाबत आझ डोमिनिकातील न्यायालय निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. यावेळी त्याच्या भारतातील प्रत्यार्पणाबाबत न्यायालय आदेश देऊ सकते. १ जून रोजी भारताने डोमिनिका पोलिसांसोबत न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात मेहूल चोक्शीच्या भारतीय पासपोर्टची प्रत होती. त्याआधारे मेहूल हा भारतीय नागरिक असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला होता.