नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यात दिल्लीतील शाळांना भेट देत ‘हॉप्पीनेस क्लास’ची संकल्पना समजून घेतली होती. मायदेशी परतल्यानंतर मेलानिया यांनी ट्विटरवरून या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या ट्विटला हजारो फॉलोअर्सनी पसंती दिल्यामुळे दिल्लीतील शाळामधील हा उपक्रम जगभरात पोहोचला आहेत.मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीत सर्वोदय शाळेला भेट दिली होती. यावेळी हॅपिनेस क्लास, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदरातिथ्याने भारावलेल्या मेलानिया यांनी अमेरिकेत पोहोचल्यावर टष्ट्वीट केले आहे. केवळ अमेरिकेसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी ‘हॅपिनेस क्लास’ ही संपूर्ण जगासाठी उत्तम उपक्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेलानिया यांनी शाळा भेटीवर चार ट्विट केले आहेत. स्वागतासाठी विद्यार्थ्यांचे आभार मानताना मेलानिया यांनी केलेल्या ट्विटला ५१ हजार लोकांनी लाईक केले आहे. तर आठ हजार फॉलोअर्सने हे टष्ट्वीट रिटष्ट्वीट केले आहे. तर व्हिडिओला तब्बल ८३ हजार फॉलोअर्सने लाईक केले आहे. दिल्लीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अनुभवणे सु:खद अनुभव होता.आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी झटणाºया शिक्षकांचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे, असेही मेलानिया यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे. शाळेतील शिक्षिका मनू गुलाटी यांचे टष्ट्वीट शेअर करताना मेलानिया यांनी शिक्षकांचेही आभार मानले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह जगभरातील अनेकांनी मेलानिया यांचे टष्ट्वीट रिटष्ट्वीट केले आहे.>श्रेयाचे राजकारणमेलानिया यांच्या टष्ट्वीटनंतर दिल्लीतील आप नेत्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दिल्लीत स्थानिक पातळीवरही महापालिका आणि दिल्ली सरकारच्या शाळांमध्ये चढाओढ सुरू आहे. शिक्षक, शाळा प्रशासनही श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावले आहे.
मेलानिया यांच्या ट्विटमुळे ‘हॅप्पीनेस क्लास’ जगभरात; केजरीवाल सरकारच्या उपक्रमाचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 5:55 AM