नवी दिल्ली - रायपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनापूर्वी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसमधील सदस्यत्व शुल्क वाढवले जाऊ शकते, तसेच काँग्रेस कार्यकारी समिती (सीडब्ल्यूसी) सदस्यांसाठीही निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.
सूत्रांनुसार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्यत्वासाठी सध्या असलेले १०० रुपये शुल्क १००० रुपये केले जाऊ शकते. वाढीव शुल्कात ४०० रुपये विकास शुल्क आणि ३०० रुपये पक्ष मासिक संदेशासाठी असतील. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्यत्व शुल्क ३००० असू शकते. ५ वर्षांसाठी सदस्याला १००० रुपये विकास शुल्क भरावे लागू शकते. शुल्कवाढीमुळे कार्यकर्त्यांवर पक्षाची जबाबदारी अधिक राहील.
प्रियांका गांधींना निवडणूक लढवावी लागेलपक्षाचे माजी अध्यक्ष, माजी पंतप्रधान, लोकसभा आणि राज्यसभेतील पक्षाचे नेते, संसदीय पक्षाचे अध्यक्ष थेट या समितीचे सदस्य म्हणून निवडले जातील. राहुल गांधी अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्याची आवश्यकता नाही; परंतु सरचिटणीस प्रियांका गांधी यांना मात्र निवडणूक लढवावी लागेल आणि त्यात त्यांना बहुमत मिळेल, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.मागासवर्गीयांना ५० टक्के कोटा?पक्षात एससी, एसटी आणि ओबीसींना ५० टक्के कोटा देण्याचाही विचार केला जात आहे. याशिवाय ५० वर्षांखालील तरुण चेहऱ्यांना प्रोत्साहन देण्यावरही काँग्रेसचा भर आहे.