नवी दिल्ली : १५ जून रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या २0 भारतीय जवानांच्या स्मरणार्थ भारतीय लष्कराने एक स्मारक बांधले आहे. पूर्व लडाखमधील १२0 क्रमांकाच्या चौकीजवळ हे स्मारक असून, याच आठवड्यात उद्घाटन करण्यात आले.या स्मारकावर २0 बहादूर शहिदांची नावे कोरण्यात आली आहेत. भारतीय हद्दीत घुसखोरी करणाºया चिनी सैनिकांना पिटाळून लावण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘आॅपरेशन स्नो लेपर्ड’अंतर्गत लढताना हे जवान शहीद झाले होते. या हातघाईच्या लढाईत आपले किती जवान मारले गेले याची माहिती चीन सरकारने अजूनही जारी केलेली नाही. अमेरिकी गुप्तचरांच्या माहितीनुसार, चीनचे ३५ सैनिक गलवानमध्ये ठार झाले आहेत.
शूरा आम्ही वंदिले! लडाखमध्ये गलवान शहिदांचे स्मारक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 2:29 AM