शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
2
बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर
3
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
4
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
5
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
6
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
7
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
8
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
9
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
10
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
11
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
12
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
13
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती
14
LLC 2024 : जणू काही 'लसिथ मलिंगा'! मराठमोळ्या केदार जाधवच्या गोलंदाजीने जुन्या आठवणींना उजाळा
15
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
16
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
17
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
18
महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका
19
Navratri 2024: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पुजा का? जाणून घ्या कारण!
20
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा

महिलांप्रमाणे साडी नेसून पुरुष करतात गरबा; 200 वर्षे जुनी परंपरा, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 2:55 PM

Men Performs Garba Dress Up As Women: नवरात्रीच्या नऊ दिवस देशभरात मोठ्या उत्साहात गरबा खेळला जातो.

Men Performs Garba Dress Up As Women: आजपासून(3 ऑक्टोबर) शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. देशातील कोट्यवधी भाविक पुढील 9 दिवस देवीच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली पाहायला मिळणार आहे. या नऊ दिवसांत देशभरात अनेक ठिकाणी गरबाचे आयोजन केले जाते. गरबा खेळण्यासाठी भाविकांचीही मोठी गर्दी होते. 

या गरबाची सुरुवात गुजरातमधून झाली आहे. गुजरातमध्ये या नऊ दिवस जवळपास सर्वजण गरबा खेळताना पाहयाल मिळतात. साधारणपणे स्त्री-पुरुष एकत्र गरबा खेळतात. किंवा महिला-महिला आणि पुरुष-पुरुषदेखील गरबा खेळताना दिसतात. पण, आम्ही तुम्हाला एका अशा गरबाबद्दल सांगणार आहोत, ज्यात पुरुष महिलांचे कपडे घालून गरबा खेळतात. यामागे सूमारे दोनशे वर्षांची परंपरा आहे.

गुजरातमध्ये अनोखा गरबानवरात्रीच्या काळात तुम्ही महिलांना गरबा खेळताना पाहिलेच असेल, पण गुजरातच्या शाहपूर भागात पुरुष महिलांचे कपडे घालून गरबा खेळताना पाहायला मिळतात. गुजरातची राजधानी अहमदाबादमधील शाहपूर भागातील साधू माता गली आणि अंबा माता मंदिरात नवरात्रीदरम्यान पुरुष साडी घालून गरबा खेळतात. नवरात्रीच्या आठव्या दिवशी परिसरातील सर्व पुरुष महिलांसारखी वेषभूषा करुन गरबा खेळतात. त्यांना पाहण्यासाठी दुरुन लोक येतात.

200 वर्षे जुनी परंपरा गुजरातमध्ये नवरात्रीदरम्यान बरौत समाजातील पुरुष साडी नेसून शाहपूर परिसरात गरबा खेळतात. सुमारे 200 वर्षांपासून ही परंपरा या भागात सुरू असल्याचे जाणकार सांगतात. यामागची कथा अशी आहे की, बरौत समाजातील पुरुषांना सदूबा नावाच्या महिलेने शाप दिला होता. हा शाप टाळण्यासाठी ते नवरात्रीत साडी नेसून गरबा खेळतात. त्याला शेरी गरबा म्हणतात आणि हे नवरात्रीच्या आठव्या दिवशीच केले जाते. या समाजाशी संबंधित लोकांचा विश्वास आहे की, असे केल्याने त्यांच्या समाजावर कोणतीही समस्या किंवा आपत्ती येत नाही.

टॅग्स :Navratriनवरात्रीNavratri Mahotsav 2024शारदीय नवरात्रोत्सव २०२४Gujaratगुजरातgarbaगरबा