ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - जर्मन लक्झरी कार उत्पादक मर्सिडिझने भारतीय बनावटीची ई-क्लास श्रेणीतली गाडी मंगळवारी बाजारात दाखल केली आहे. एक्स-शो रूम 56.15 लाख रुपये किमतीची ही गाडी असून बीएमडब्ल्यू, जॅग्वार, ऑडी आणि व्होल्वो या स्पर्धक गाड्यांना हे मॉडेल चांगलीच लढत देईल अशी अपेक्षा आहे.
मर्सिडिझ 2017 ई - क्लासची 5 महत्त्वाची फीचर्स
- संपूर्ण एलईडी लॅम्प, एअर सस्पेंन्शन
- चारही सीट इलेक्ट्रॉनिकली ऑपरेट करण्याची क्षमता
- 3 स्पीकर असलेली साउंड सिस्टिम
- पॅनोरॅमिक सनरूफ
- स्टीअरिंग व्हीलवर स्पर्शानं चालणारे कंट्रोल्स
भारतीय ग्राहकांना पेट्रोल अथवा डिझेल अशा दोन पर्यायांमध्ये ही गाडी उपलब्ध असेल. पेट्रोल इंजिन 2.0 लिटर क्षमतेचं तर डिझेल इंजिन 3.0 लिटर क्षमतेचं आहे. शून्यापासून 100 किलोमीटरचे वेग पेट्रोलची गाडी 8.5 सेंकदात तर डिझेलची गाडी 6.6 सेंकदात गाठत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मर्सिडिझसाठी भारतामधले प्रमुख स्पर्धक ऑडी ए-6, बीएमडब्ल्यू 5 सीरीज, व्होल्वो एस-90 आणि जॅग्वार एक्सएफ प्लस या गाड्या आहेत.