केरळ- न्यायालयानं अश्लील फोटो ठेवण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पुरुषानं स्वतःजवळ अश्लील फोटो बाळगणं हा स्त्री प्रतिबंधक निषेध कायद्यांतर्गत गुन्हा ठरत नसल्याचा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयानं दिला आहे. यासंदर्भात एका महिलेनं दाखल केलेली याचिका फेटाळत न्यायालयानं हा निर्णय दिला. अश्लील फोटो बाळगणं आणि ते विकणं हा कायद्यानं गुन्हा असल्याचं महिलेनं म्हटलं होतं. न्यायमूर्ती विजय राघवन यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की, जर एखाद्या तरुणाकडे अश्लील फोटो असल्यास लागलीच त्याला 1968मधील कलम 60 लागू होत नाही. जर त्यानं त्या फोटोंचा इतर कोणत्याही उद्देशासाठी किंवा जाहिरातीसाठी दुरुपयोग केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करता येऊ शकतो. 2008मध्ये या प्रकरणात याचिका दाखल केली होती. त्यानंतर तो निकाल राखून ठेवण्यात आला होता.त्यादरम्यान पोलिसांनी कोल्लम बस स्थानकावर तपास मोहीम राबवली असता, दोन जणांकडे बॅग आढळली, त्यांच्याकडे दोन कॅमेरेसुद्धा होते. त्या व्यक्तींकडे अश्लील फोटो आणि व्हिडीओ असल्याचंही तपासात उघड झालं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली अन् कॅमेरे जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी कोल्लम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अंतिम रिपोर्ट सोपवला.
आता स्वतःजवळ अश्लील फोटो ठेवणं गुन्हा नाही- न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 1:11 PM