नवी दिल्ली : लैंगिक शोषणाविरुद्ध महिलांनी सुरु केलेल्या ‘मी टू’ मोहिमेमुळे केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे, तर अन्य क्षेत्रांतही हे प्रकार होत असल्याचे उघड झाले आहे. एका महिला पत्रकाराने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर हिंदुस्थान टाईमचे ब्युरो चीफ प्रशांत झा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, तर टाइम्स आॅफ इंडियाच्या हैदराबाद आवृत्तीचे संपादक के.आर. श्रीनिवास यांना कंपनीने सात दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.के. आर. श्रीनिवास यांच्यावरील आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना प्रशासकीय रजेवर पाठविले आहे, असे टाइम्स आॅफ इंडियाने म्हटले आहे. श्रीनिवास यांच्यावर किमान पाच महिला पत्रकारांनी आरोप केलेहोते.प्रशांत झा यांचाही राजीनामा हिंदुस्थान टाइम्सने स्वीकारला असून, ती जबाबदारी अन्य संपादकाकडे सोपविली आहे. मात्र, परराष्ट्र राज्यमंत्री व माजी ज्येष्ठ पत्रकार एम.जे. अकबर यांनी स्वत:वरील आरोपांना अद्याप उत्तर दिलेलेनाही.केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सोमवारीच ‘मी टू’ मोहिमेचे स्वागत केले होते. मात्र, त्यांच्याच पक्षाचे भाजपचे नेते व परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाबद्दल त्यांनी स्वत: व भाजपनेही बोलण्याचे टाळले आहे.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याविषयीच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले, तर मंत्रालयानेही अकबर यांच्यावरील आरोपांबद्दल बोलण्यास नकार दिला. अकबर यांनी ‘एशियन एज’चे संपादक असताना नोकरीच्या मुलाखतीच्या निमित्ताने आपल्याला हॉटेलात बोलावून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप महिला पत्रकाराने केलाआहे.‘हिंदुस्थान टाइम्स’चे ब्युरो चीफ यांच्यावरही महिलेच्या शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर माझ्यावर झालेले आरोप पाहता, मी ब्युरो चीफ व राजकीय संपादक या पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रशांत झा यांनी म्हटले आहे. एका वकील महिलेला त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह मेसेजेस पाठवले होते, असा आरोप आहे.भाजपा खासदाराचा वेगळा सूरमनेका गांधी यांनी मी टू मोहिमेचे स्वागत केले असले तरी त्यांच्याच पक्षाचे खासदार उदित राज यांनी ही मोहीम काही मंडळींना बदनाम करण्यासाठी चालवली असल्याचा वास येतो, असे म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीविरुद्ध १० वर्षांनी आरोप करून काय उपयोग? त्याची सत्यता कशी पडताळून पाहता येणार, असे सवाल करीत, मी टू चळवळीतून एक चुकीची प्रथा सुरू होत असल्याचे खा. उदित राज यांनी म्हटले आहे.एडिटर्स गिल्ड आॅफ इंडियाने महिला पत्रकारांचा त्यांच्याच पुरुष सहकाऱ्यांकडून लैंगिक छळ झाल्याच्या आरोपांबद्दल निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्या घटनांचा उल्लेख झालेला आहे त्यांची नि:पक्षपातीपणे चौकशी संबंधित प्रसारमाध्यमाच्या संघटनेने करावी. लैंगिक छळ/बलात्काराच्या आरोपांत जो कोणी दोषी आढळेल त्याला शिक्षा केली जावी, असे आवाहन या निवेदनात केले गेले आहे.सर्वोच्च न्यायालयात सार्वजनिक हित याचिका दाखल झाली असून, माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी बलात्कार केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. या याचिकेत म्हटले आहे की, ज्या लोकांमध्ये सोली सोराबजी यांची नेहमी ऊठबस असते तेथे त्यांची ‘प्रतिमा’ ‘महिलांचे सिरियल सेक्शुअल हॅरासर’ अशी आहे, असे अनुषा सोनी यांनी टष्ट्वीट केले आहे.
#MeToo : एका संपादकाचा राजीनामा, तर दुसरा संपादक सक्तीच्या रजेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 1:27 AM