नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर पल्लवी गोगोई यांनी पलटवार केला आहे. सहमतीने नव्हे, तर भीतीनं संबंध प्रस्थापित झाल्याचा तिने पुनरुच्चार केला आहे. अकबर यांनी मला भीती दाखवून माझा चुकीच्या पद्धतीनं वापर करत संबंध प्रस्थापित केल्याचं ती म्हणाली आहे. पल्लवी गोगोईनं अकबर यांच्यावर केलेल्या आरोपांवर ती ठाम आहे. माझ्याबरोबर झालेल्या दुष्कृत्याची जबाबदारी घेण्याचं सोडून त्यांनी सहमतीनं संबंध प्रस्थापित झाल्याचं सांगितलं. मी माझ्या आधीच्या विधानावर कायम आहे. मी सत्य जगाला सांगत राहीन. जेणेकरून अकबर यांनी अशाच दुस-या महिलांवर केलेल्या अन्यायाची त्यांना जाणीव होऊन त्या पुढे येतील. परंतु अकबर यांची पत्नी मल्लिका अकबर यांनी एम. जे. यांची पाठराखण करत ती महिला पत्रकार खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.
(#MeToo : अकबर यांच्यावर आता अमेरिकेतील महिला पत्रकाराचा आरोप)
भारतीय पत्रकार पल्लवी गोगोई 23 वर्षांपूर्वी एशियन एजमध्ये काम करत होती. यावेळी त्या 22 वर्षांच्या होत्या. सध्या त्या नॅशनल पब्लिक रेडियोमध्ये काम करतात. एशियन एजमध्ये असताना पल्लवी जयपूरमध्ये एका स्टोरीवर काम करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी अकबर प्रसिद्ध संपादक होते. पल्लवीला पत्रकारितेची फारशी माहितीही नव्हती. पल्लवी या अकबर यांची पुस्तके वाचून प्रभावित झाल्या होत्या. 23च्या वयामध्ये त्यांना संपादकीय पानाची जबाबदारी देण्यात आली. यासाठी त्यांना राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलावे लागायचे. जसवंत सिंह, अरुण शौरी आणि नलिनी सिंह यांच्यासारख्या नेत्यांना फोन करावा लागत होता. पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार ही घटना 1994 मधली आहे. अकबर यांच्या केबिनमध्ये पल्लवी संपादकीय पान दाखविण्यासाठी गेल्या होत्या. ते काहीतरी चांगली हेडलाईन देतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी माझे चुंबन घ्यायला लागले. मला धक्काच बसला. मी तडक ऑफिसमधून निघाले. लाज वाटत होती. माझी मैत्रिण तुषिता हिला आजही तेव्हाच माझा चेहला आठवतो. तिने विचारल्यावर तिला खरेखरे सांगितले. तेव्हा ती एकटीच होती, असेही पल्लवी यांनी लेखात म्हटले आहे. (#MeToo : अकबर यांच्या पत्नीकडून पाठराखण; ती पत्रकार खोटे बोलतेय)
जयपूरमध्ये बलात्कारावेळी कपडेच फाडले....मुंबईच्या घटनेनंतर मला एका आडवळणाच्या गावात कामासाठी पाठविण्यात आले होते. यामुळे सकाऴी लवकर ऑफिसमध्ये जाऊन संपादकीय पानाचे काम संपवून पुन्हा त्या गावात रिपोर्टिंगसाठी जावे लागे. या गावात एका जोडप्याला काही लोकांनी फासावर लटकावले होते. मला देण्यात आलेले काम जयपूरमध्ये संपले होते. मात्र, अकबर यांनी सांगितले की जयपूरमध्येच ते या प्रकरणाच्या स्टोरीवर चर्चा करणार आहेत. यामुळे त्यांनी मला त्यांच्या हॉटेलच्या खोलीत बोलावले. दबावामुळे मी त्यांच्या खोलीत गेले. मात्र, त्यांनी माझे कपडे फाडले आणि बलात्कार केला. यावेळी मी त्यांना विरोधही केला. मात्र, पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे पल्लवी यांनी या लेखामध्ये म्हटले आहे.