गेल्या दोन दिवसापासून भारतीय कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह देशातील अनेक बडे कुस्तीपटू जंतरमंतरवर फेडरेशनच्या विरोधात धरणे आंदोलन करत आहेत. दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावल्याची माहिती समोर आली आहे.
महिला कुस्तीपटुंनी त्यांच्याविरोधात आरोप केला आहेत. या प्रकरणी क्रीडा मंत्रालयाकडे कोणतीही तक्रार आलेली नसल्याचे बोलले जात आहे. क्रीडा मंत्रालयाकडे अधिकृतपणे तक्रार येईपर्यंत ते फेडरेशनच्या अध्यक्षांवर कोणतीही कारवाई करणार नाहीत, असंही सांगण्यात येत आहे.
हे लोक आता ऑलिम्पिक पदकही जिंकू शकत नाहीत; आंदोलक कुस्तीपटूंवर ब्रिजभूषण सिंह यांचा पलटवार
ब्रिजभूषण यांनीही क्रीडामंत्र्यांना फोनवरून या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले असल्याचे सांगितले जात आहे. आपल्यावरील एकही आरोप खरा ठरला तर आपल्याला फाशी द्यावी, असे त्यांनी फोनवरून मंत्र्यांना सांगितले आहे. 22 ते 28 वयोगटात कुस्तीपटू चमकदार कामगिरी करतात. विरोध करणारे खेळाडू ऑलिम्पिक पदक जिंकू शकत नाहीत आणि त्याचे रूपांतर संतापात झाले आहे, असंही त्यांनी म्हटले आहे.
अंशू मलिकने ब्रिजभूषण यांच्यावर आरोप केले आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर महिला खेळाडूंसमोर त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्रीडा मंत्रालयाने आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना चर्चेसाठी बोलावले आहे. लखनौ येथे होणारे राष्ट्रीय शिबिर रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनीही सकाळी मौन उपोषण केले.