शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

वाटेतच अडकली मेट्रो, श्वास गुदमरून बेशुद्ध झाली महिला प्रवाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 12:43 PM

आरामदायक प्रवासासाठीचा उत्तम पर्याय म्हणून ओळखली जाणारी  मेट्रो मध्येच बंद पडल्यास काय होऊ शकते याचा अनुभव प्रवाशांनी रविवारी घेतला.

नवी दिल्ली -  आरामदायक प्रवासासाठीचा उत्तम पर्याय म्हणून ओळखली जाणारी  मेट्रो मध्येच बंद पडल्यास काय होऊ शकते याचा अनुभव प्रवाशांनी रविवारी घेतला. नवी दिल्लीतील मेट्रोमार्गावर तांत्रिक बिघाडामुळे एक मेट्रो ट्रेन वाटेतच अडकली. या बंद पडलेल्या मेट्रो ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आपातकालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. मात्र यादरम्यान एक महिला प्रवाशी बेशुद्ध झाली. दिल्लीतील शात्री पार्क आणि काश्मीर गेट मेट्रो स्थानकांदरम्यान सवीवारी सकाळी 6 वाजून 40 च्या दरम्यान हा प्रकार घडला. मेट्रो ट्रेन काश्मीर गेट स्थानकाजवळ पोहोचत असतानाच ट्रेनच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन मेट्रो ट्रेन जागीच थांबली. दरवाजे बंद असल्याने ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. घटनेची खबर त्वरित प्रशासनास देण्यात आली. त्यानंतर मेट्रोची क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली त्यांनी आपातकालीन द्वार उघडून प्रवाशांना बाहेर काढले. मात्र याच दरम्यान, एक महिला बेशुद्ध पडली.  या महिलेला स्ट्रेचरवरून बाहेर काढून त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.  या बिघाडानंतर शास्री पार्क आणि काश्मीर गेट स्थानकांदरम्यान, मेट्रो सेवा एकेरी मार्गावरून चालवण्यात आली. मेट्रो बंद पडली तेव्हा आम्ही आता अडकलो, असे आम्हाला वाटले,  मात्र सुदैवाने आमची सुखरूप सुटका झाली.  जर वेळीच आपातकालीन दरवाजे उघडले नसते तर प्रवाशांना अडचण झाली असती, असे मेट्रोमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी सांगितले. रविवारचा दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी कमी होती, इतर दिवशी अशी घडना घडली असती तर अडचणी वाढल्या असत्या, असेही प्रवाशांकडून सांगण्यात आले.  

इकडे मुंबईत  मेट्रो-३ प्रकल्पामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करणा-या जनहित याचिकेवर उत्तर देताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो मुंबईची गरज असल्याचे म्हटले आहे. मुंबईत उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत आहे. ही सेवा अपुरी असल्याने जलदगतीने मेट्रो-३ प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे, असे एमएमआरसीएलने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले.

टॅग्स :Metroमेट्रोNew Delhiनवी दिल्लीIndiaभारत