शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 7:37 PM

सायबर फसवणूक रोखण्यासाठी गृह मंत्रालयाची सायबर विंग I4C सात्यत्याने काम करत असल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्ली : देशात काही सायबर गुन्हेगारीची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे सरकारी यंत्रणा सतर्क आहेत. सायबर फसवणूक रोखण्यासाठी गृह मंत्रालयाची सायबर विंग I4C सात्यत्याने काम करत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात कठोर कारवाई करत सरकारने सहा लाख मोबाईल फोन बंद केले आहेत. यासोबतच एमएचएच्या सायबर विंगच्या आदेशानुसार, ६५ हजार सायबर फ्रॉड यूआरएल देखील ब्लॉक करण्यात आल्या आहेत. 

सुत्रांनी दिलेल्या 'आज तक'ला माहितीनुसार, सायबर फसवणून संबंधित जवळपास ८०० एप्लिकेशन्स देखील ब्लॉक करण्यात आले आहेत. दरम्यान, सायबर फसवणूक रोखण्यासाठी गृह मंत्रालयाची I4C विंग सातत्याने मोठी पावले उचलत आहे. २०२३ मध्ये नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) कडे १ लाखांहून अधिक गुंतवणूक घोटाळ्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

संपूर्ण देशात यासंबंधी जवळपास १७ हजार एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. जानेवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ पर्यंत डिजिटल अटकेच्या सहा हजार तक्रारी, ट्रेडिंग घोटाळ्याच्या २०,०४३ तक्रारी, गुंतवणूक घोटाळ्याच्या ६२,६८७ तक्रारी आणि डेटिंग घोटाळ्याच्या १७२५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

सायबर विंगने काय कारवाई केली?- गेल्या ४ महिन्यांत ३.२५ लाख Mule Accounts (फसवी खाती) डेबिट फ्रीज करण्यात आली.- सायबर गुन्ह्यांमध्ये वापरले जाणारे ३४०१ सोशल मीडिया, वेबसाइट्स, व्हॉट्सॲप ग्रुप बंद करण्यात आले.- गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीमुळे २८०० कोटी रुपये वाचले.- एमएचएने ८ लाख ५० हजार सायबर पीडितांना फसवणुकीपासून वाचवले.

सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी I4C विंग उचलतंय अनेक पावलं...1. देशभरातील सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समन्वय केंद्र तयार करणे.2. सायबर गुन्ह्याशी संबंधित तक्रारी सहज दाखल करण्यात मदत करणे.3. सायबर गुन्हे रोखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना मदत करणे.4. सायबर गुन्ह्यांचे ट्रेंड आणि नमुने ओळखणे.5. सायबर गुन्ह्याशी संबंधित लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणे.6. बनावट डिजिटल प्लॅटफॉर्म ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे.7. डिजिटल अटकेबाबत अलर्ट जारी करणे.8. डिजिटल अटकेच्या वाढत्या घटनांबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पोलिसांना अलर्ट जारी करणे.9. सायबर कमांडो प्रशिक्षण. तसेच पुढील पाच वर्षांत ५ हजार सायबर कमांडोना प्रशिक्षण आणि सुसज्ज करणे.

I4C विंग म्हणजे काय?I4C विंगची स्थापना ५ ऑक्टोबर २०१८ रोजी गृह मंत्रालयाच्या सायबर आणि माहिती सुरक्षा विभाग (CIS विभाग) अंतर्गत केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत करण्यात आली. देशभरातील सायबर गुन्ह्यांशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समन्वय केंद्राची स्थापना करणे, हे या विंगचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. हे विंग केंद्र सर्व राज्यांच्या नियंत्रण कक्षांशी संपर्क साधून उच्च प्राधान्य प्रकरणांवर लक्ष ठेवते.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारी