नवी दिल्लीः 1987च्या पूर्वी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजलं जाणार असल्याचं केंद्रातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. तसेच ज्यांचे आई-वडील 1987पूर्वी भारतात जन्मलेले असल्यास त्यांना प्रामाणिक भारतीय नागरिक (Bona Fide Indian Citizens) मानलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019वरून चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. तसेच देशात लागू होणाऱ्या नॅशनल रजिस्ट्रार ऑफ सिटिजन्स (NRC)बद्दलही नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकत्व कायद्या(Citizenship Act)मध्ये 2004ला संशोधन करण्यात आलं होतं. आसाम सोडल्यास इतर कोणत्याही राज्यात आई-वडिलांपैकी कोणतीही एक व्यक्ती भारतीय नागरिक आहे आणि ते अवैध निर्वासित (Illegal Immigrant) नसल्यास त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्व बहाल केलं जातं. या कायद्यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत. ज्यांचे आई-वडील 1987पूर्वी देशात जन्मलेले आहेत, त्यांना भारतीय नागरिकच समजलं जाणार आहे. आसाममध्ये ओळख आणि नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आसाम करार 1971 करण्यात आला होता.
1987च्या आधी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजलं जाणार, केंद्रातल्या अधिकाऱ्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 10:00 AM