मुंबई : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हिरवा झेंडा दाखविला असून राज्यांच्या शिक्षण विभागाला तसे पत्रही पाठविण्यात आले आहे. यामुळे ठाकरे सरकारने जरी परीक्षा रद्द केलेली असली तरीही विद्यापीठांनापरीक्षा घ्याव्या लागणार असल्याचे दिसत आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने शिक्षण विभागाला पत्र पाठविले असून विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास अनुमती दिली आहे. तसेच उच्च शिक्षण संस्थाही परीक्षा घेऊ शकणार आहेत. मात्र, या परीक्षा युजीसीच्या गाइडलाइन्सनुसार घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. युजीसीही लवकरच परीक्षांसाठी नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय आरोग्य खात्याच्या नियमांनुसार परीक्षा व्हाव्यात, असेही या पत्रामध्ये म्हटले आहे.
दहा दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा देताना व्यवसायिक/बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यापीठांनी ठरवलेल्या सुत्रानुसार शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले होते. तसेच यासाठी मोदींनी संबंधित अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असं आवाहन ठाकरे सरकारकडून करण्यात आले होते. मात्र, आता केंद्रानेच आदेश दिल्याने य़ा परीक्षा विद्यापीठांना घ्याव्या लागणार आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
गुड न्यूज! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संखेत मोठी घट
टाटा पुन्हा मदतीला धावले! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका
ठरलं! 8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण...; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले
गृहमंत्र्यांनी पोलीस बदल्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पनाच दिली नसेल; देवेंद्र फडणवीसांना वेगळीच शंका
लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार
अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट
धक्कादायक! मालकाकडून व्यवस्थापकाचे अपहरण; गुप्तांगामध्ये सॅनिटायझर स्प्रे केले
धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302 रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा
शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत