देशातील शेतकरी आंदोलनावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावरुन टीका सुरू झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. जगभरातील सेलिब्रिटी शेतकरी आंदालनाच्या मुद्द्यांवरुन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानानंतर (pop star rihanna) आता पॉर्न स्टार मिया खलिफानंही (mia khalifa) शेतकरी आंदालनाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. इतकंच नाही, तर भारतीय सेलिब्रिटींनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. (mia khalifa takes jibe on priyanka chopra over farmers protest)
मिया खलिफानं आता बॉलिवूडची 'देसी गर्ल' आणि हॉलीवूडमध्ये नाव कमावलेल्या प्रियांका चोप्रालाही शेतकऱ्यांच्या आंदोलनात खेचलं आहे. शेतकरी आंदोलनावर प्रियांका चोप्रा गप्प का?, असा सवाल मिया खलिफानं उपस्थित केला आहे.
विद्रोही साहित्य संमेलानाचे ग्रेटा थनबर्गला निमंत्रण, ग्रेटा महाराष्ट्रात येणार?
"मिसेस जोनस शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर काही बोलणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. ज्यापद्धतीनं बेरुत मधल्या घटनेवर शकीरानं मौन धारण केलं होतं. त्याचपद्धतीनं प्रियांकाही आता शांत राहणार वाटतं", अशा आशयाचं ट्विट मिया खलिफा हिनं केलं आहे.
'त्या' ट्विटमुळे भडकले रामायणचे लक्ष्मण, रिहानासारख्या लोकांनी उगाच आमच्या देशात ढवळाढवळ करु नये
प्रियांकानं शेतकरी आंदोलनावर केव्हा आणि का केलं ट्विट?प्रियांकानं शेतकरी आंदोलनाबाबत डिसेंबर महिन्यात ट्विट करुन शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. पंजाबचा गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज याचं ट्विट रिट्विट करत प्रियांका म्हणाली होती की, "शेतकरी हे आमचे अन्नदाते आहेत. त्यांच्या भीतीचं समाधान करणं गरजेचं आहे. त्यांचा विश्वासाला आपल्याला सार्थ ठरावं लागेल आणि एका लोकशाही संपन्न देशात हे आंदोलन लवकरात लवकर संपुष्टात यावं यासाठी प्रयत्न करायला हवेत", असं प्रियांकानं म्हटलं होतं. पण या ट्विटनंतर प्रियांकानं अद्याप शेतकरी आंदोलनावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कंगनानं प्रियांका आणि दिलजीतवर केलेली टीकामिया खलिफाच्या आधी बॉलिवूड अभिनेती कंगना राणौतनेही प्रियांका चोप्रावर जोरदार टीका केली होती. प्रियांका आणि दिलजीत हे दोघंही शेतकऱ्यांना भडकवून गायब झाले आहेत, असं कंगनानं म्हटलं होतं. दरम्यान, मिया खलिफा गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी आंदालनावरुन वारंवार ट्विट करताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत इंटरनेटवर सेवा बंद करण्याच्या निर्णयाबाबत मिया खलिफानं ट्विट केलं होतं. पण मिया खलिफाला पैसे देऊन तिच्याकडून असे ट्विट केले जात आहेत, असा आरोप केला जात आहे. याबाबत मिया खलिफालाही ट्रोल केलं जात आहे.