शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मिशेल उलगडणार सगळ्यांची गुपिते, मोदींची सोनिया गांधींवर थेट टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 2:34 PM

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगुस्टा वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

सुमेरपूर ( राजस्थान) -  राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगुस्टा वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. सुमेरपूर येथील प्रचारसभेत अगुस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहार प्रकरणात प्रत्यार्पण झालेल्या  ख्रिश्चियन मिशेल मिशेलचा धागा पकडत नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर थेट टीका केली.मोदी म्हणाले, 2014 च्या माझ्या सभांमधील माझ्या भाषणांमध्ये मी हेलिकॉप्टर घोटाळ्याबाबत उल्लेख केला होता. हजारो कोटींचा घोटाळा झाला होता. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर आणि ती चिठ्ठी तुम्हाला माहीत असेलच. मॅडम सोनियाजींची चिठ्ठी आहे. आमचे सरकार आल्यावर आम्ही कागदपत्रे शोधली. त्याचदरम्यान आज एक माणूस आमच्या हाती लागला. हा हेलिकॉप्टर खरेदी-विक्रीच्या दलालीचे काम करत होता. भारतातील नामदारांच्या मित्रांची बडदास्त ठेवायचा. आज तुम्ही वाचलंच असेल की भारत सरकारने त्याला दुबई येथून अटक केली आहे. हा दलाल आता अनेक गौप्यस्फोट करणार आहे. कुणास ठावूक हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचतेय ते.''   

  यावेळी मोदींनी काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केला. ''काँग्रेसच्या काळात लुटालुटीचा खेळ सुरू होता. त्याबाबतही सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय घेतला आहे. मात्र ती बातमी वृत्तपत्रातील एका कोपऱ्यात आली आहे. खरंतर ती मुख्य बातमी असायला हवी होती.'' असेही मोदी म्हणाले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकSonia Gandhiसोनिया गांधी