नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भारतात विरोध प्रदर्शन अद्यापही सुरूच आहे. त्यानंतर आता अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिस्थितीवर खंत व्यक्त केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनीसुद्धा या परिस्थितीला दु:खद असल्याचं म्हटलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात बजफीडचे संपादक बेन स्मिथ यांनी सत्या नाडेला यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी या सर्व परिस्थितीवर भाष्य केलं. मला वाटतं जे होतंय ते अतिशय दुःखद आहे.मायक्रोसॉफ्टचे सीईओ नाडेला यांनी मॅनहटन इथल्या एका कार्यक्रमात हे विधान केलं. विशेष म्हणजे नागरिकत्व कायद्यावरून देशभरात विरोधी पक्षांचं विरोध प्रदर्शन सुरू असतानाच नाडेला यांनी हे वक्तव्य केल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. जर एखादा बांगलादेशी निर्वासित भारतात इन्फोसिसचा सीईओ बनल्यास मला आनंद होईल. सत्या नाडेला यांच्यामार्फत मायक्रोसॉफ्ट इंडियाद्वारे खुलासा करण्यात आला आहे. प्रत्येक देशाला आपल्या सीमा परिभाषित करणं, राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करणं आणि कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत हे सर्व जनता आणि सरकारकडून विचार विनिमयातून ठरवलं जातं. मी भारतीय मूल्यांच्या आधारावरच मोठा झालो आहे. भारतातल्या विविधतेतल्या संस्कृतीतही एकता आहे. अमेरिकेतला माझा प्रवासी अनुभवही चांगला राहिला आहे. भारतात येऊन एखाद्या प्रवासी निर्वासितानं चांगला स्टार्ट अप व्यवसाय, मोठी कंपनी सांभाळण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. जेणेकरून त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांचं मोठं विधान; म्हणाले, भारतात जे घडतंय ते अतिशय दु:खद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 7:52 AM
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भारतात विरोध प्रदर्शन अद्यापही सुरूच आहे.
ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात भारतात विरोध प्रदर्शन अद्यापही सुरूच आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनीसुद्धा या परिस्थितीला दु:खद असल्याचं म्हटलं आहे.जर एखादा बांगलादेशी निर्वासित भारतात इन्फोसिसचा सीईओ बनल्यास मला आनंद होईल.