शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

राज्यात केव्हाही ‘मध्यावधी’ निवडणूक!

By admin | Published: November 19, 2014 9:50 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आज राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक होऊ शकते, असे भाकीत वर्तविल्यामुळे राजकीय पतंगबाजीला पुन्हा ऊत आला.

शरद पवार यांचे भाकीत : मुख्यमंत्री म्हणतात, सरकारला धोका नाहीयदु जोशी, चोंढी (अलिबाग)राज्यातील भाजपाला सरकारला ‘स्थैर्य’ लाभावे म्हणून आतून-बाहेरून पाठिंबा देऊ केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आज राज्यात केव्हाही मध्यावधी निवडणूक होऊ शकते, असे भाकीत वर्तविल्यामुळे राजकीय पतंगबाजीला पुन्हा ऊत आला. तर दुसरीकडे, पवार काहीही म्हणोत आमचे सरकार स्थिर आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला!विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची कारणमीमांसा व भविष्यातील वाटचालीचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन दिवसांची बैठक आजपासून अलिबागजवळील चोंडी येथील एका रिसोर्टवर सुरू आहे. बैठकीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष (पान ५ वर) सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते असे निवडक २०० जण बैठकीत सहभागी झाले आहेत. पवार म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकारला सरसकट पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही घेऊ शकत नाही. सरकारने वादग्रस्त विषयांत लक्ष घातले नाही, सामूहिकपणे विकासाचे निर्णय झाले नाहीत तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. सध्याची परिस्थिती दीर्घकालिन स्थिरतेला मदत करणारी दिसत नाही. ती आणखी बिघडली तर निवडणुकीला सामोरे जावे लागेल. राज्य चालविणे अशक्य झाले तर निवडणुकीला सामोरे जावू शकतो का याची चाचपणी करून भाजपाही मध्यावधी निवडणुकीचा विचार करू शकतो.ही वेळ कधी येईल याची आज खात्री देता येत नाही, त्यामुळे सर्वांनी निवडणुकीसाठी तयार राहावे, असे आवाहनही पवार यांनी केले.सिंचनाच्या कथित घोटाळ्यांची राज्य सरकारने खुशाल चौकशी करावी, असे आव्हान देऊन पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींच्या मागणीखातर गरजेपेक्षा जास्त सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले हा भ्रष्टाचार नव्हता. आता सामान्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाची वेळ आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातले असूनही कापसात क्विंटलमागे दीड हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे, असा आरोपही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)बहुमताचे प्रमाणपत्रविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहिले. त्यांनी विरोधात मतदान केले नाही की बाजूने केले नाही. हे सरकार चालेल तितके चालेल. ते पाच वर्षे टिकविण्याचा मक्ता राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला नाही, असा इशारा देत भाजपाकडे १२२ आमदार होते. शिवसेनेकडे ६३, काँग्रेसकडे ४२ असे दोन्हींमिळून १०५ आमदार होतात. आम्ही तटस्थ होतो. याचा अर्थ भाजपाकडे बहुमत होते, असे प्रमाणपत्र पवार यांनी दिले.स्थिर सरकार - मुख्यमंत्रीराज्यातील सरकार स्थिर आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातील जनतेने खूप अपेक्षेने सरकार निवडून दिले आहे. सरकारने ५ वर्षे काम करावे अशी जनतेची अपेक्षा आहे. विधानसभेतील एकाही पक्षाच्या आमदाराला मध्यावधी निवडणुका नको आहेत. त्यामुळे मध्यावधी निवडणुका होतील, असे वाटत नाही. सेनेकरिता चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत. त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, असेही फडणवीस म्हणाले.विरोधकाचीच भूमिका बजावणारमहाराष्ट्रातील मतदारराजाने पवारांना माफ करावे. ते केव्हा काय बोलतात ते त्यांना कळत नाही, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाने हे लक्षात घ्यावे की पवार बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत. आम्ही ठामपणे विरोधकांची भूमिका बजावणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.निवडणुकीला काँग्रेस तयारनिवडणुका कधीही झाल्या तरी त्याकरिता काँग्रेस तयार आहे, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रावर भाजपा मध्यावधी निवडणुका लादू शकते. परंतु त्या परिस्थितीला आम्ही घाबरत नाही. उलटपक्षी निर्धाराने निवडणुकीचा सामना करू, असेही ठाकरे म्हणाले.