खड्यातील पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू एमआयडीसीतील घटना : कंपनी व शेत मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
By admin | Published: February 12, 2016 10:45 PM
जळगाव: कंपनीचे रसायनयुक्त पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून विशाल मांगेलाल बारेला (वय ३) व खुशाल मांगेलाल बारेला (वय ५) दोन्ही रा.मेंदड्यापानी जि.सेंदवा या बालकांचा शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसीत मृत्यू झाला. दरम्यान, कंपनीमालक व शेतमालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच मृत्यू झालेल्या बालकांच्या पालकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
जळगाव: कंपनीचे रसायनयुक्त पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यात बुडून विशाल मांगेलाल बारेला (वय ३) व खुशाल मांगेलाल बारेला (वय ५) दोन्ही रा.मेंदड्यापानी जि.सेंदवा या बालकांचा शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एमआयडीसीत मृत्यू झाला. दरम्यान, कंपनीमालक व शेतमालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच मृत्यू झालेल्या बालकांच्या पालकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.मांगीलाल वाहर्या बारेला हे त्यांची पत्नी मनीषा यांच्यासह उदरनिर्वाहासाठी जळगावात आले होते. एमआयडीसीतील जगवानी नगरात धीरज महाजन यांच्या मालकीच्या अंजनी कन्स्ट्रक्शनच्या बांधकामावर बारेला हे मजूर व वॉचमन म्हणून कामाला आहेत. तेथेच त्यांचे वास्तव्य आहे. पत्नीही तेथेच काम करते.आईकडे मागीतला भातशुक्रवारी दुपारी विशाल व खुशाल या दोघं मुलांनी आई मनीषा हिच्याकडे जेवण मागितले. तिने भाजी व पोळी दिली असता त्यांनी ते जेवण नको म्हणून भाताची मागणी केली. मुलांच्या आवडीनुसार तिने भात तयार केला. त्या दरम्यानच्या वेळेत मुले ही खेळता-खेळता शेजारीच असलेल्या दिलीप चोपडा यांच्या शेतात पोहचले. तेथे सोना इंडस्ट्रीज या कंपनीने रसायनयुक्त पाणी साठविण्यासाठी १५ फुट खोल खड्डा केला आहे. त्या खड्ड्यात ही दोन्ही मुले पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.बापानेच काढले मुलांनादुपारी जेवणाची वेळ झाल्याने मांगीलाल बारेला हे मुलांना आवाज देत होते, परंतु त्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने ते त्यांना शोधत असतानाच शेतातील सांडपाण्याच्या खड्याच्या बाहेर दोघं मुलांच्या चपला पडलेला दिसल्या. शंकेची पाल चुकचुकल्याने बारेला यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या पाण्यात उडी घेतली. त्यात दोन्ही मुले ही मयतावस्थेत आढळून आली.अन् बापाने हंबरडा फोडलापाण्यातून मृतदेह काढताच बारेला यांनी मुलांना पाहून हंबरडा फोडला. हा प्रकार पाहून रहिवाशी व पत्नी मनीषा यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मुलांना पाहून आईदेखील सुन्न झाली. काय करावे हे तिला सूचत नव्हते. परिसरातील महिलांनी तिला सावरले तर आबा भिका देशमुख यांनी स्वत:च्या रिक्षात टाकून बालकांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.