हवाई दलाचे मिग-21 विमान ग्वाल्हेरमध्ये कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:37 AM2019-09-25T11:37:49+5:302019-09-25T11:38:41+5:30
हवाई दलाचे एक मिग 21 ट्रेनर विमान आज ग्वाल्हेरमध्ये अपघातग्रस्त झाले.
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) - हवाई दलाचे एक मिग 21 ट्रेनर विमान आज ग्वाल्हेरमध्ये अपघातग्रस्त झाले. मात्र विमानात असलेले दोन्ही वैमानिक संभाव्य धोका ओळखून वेळीच बाहेर पडल्याने दोन्ही पायलट सुखरूप बचावले. विमानाने नियमित सरावासाठी उड्डाण केले असताना हा अपघात झाला.
Madhya Pradesh: MiG 21 Trainer aircraft of the Indian Air Force crashed in Gwalior, today. Both the pilots, including a Group Captain and a squadron leader, managed to eject safely. pic.twitter.com/D379hDNqJM
— ANI (@ANI) September 25, 2019
अपघातग्रस्त विमानामध्ये एक ग्रुप कॅप्टन आणि एक स्क्वॉड्रन लीडर असे दोन वैमानिक होते. मात्र अपघातावेळी योग्य प्रसंगावधान राखल्याने ते बचावले. यंदाच्या वर्षात मिग 21 विमानाला अपघात होण्याची ही तिसरी वेळ आहे.
Madhya Pradesh: MiG 21 Trainer aircraft of the Indian Air Force crashed in Gwalior, today. Both the pilots, including a Group Captain and a squadron leader, managed to eject safely. pic.twitter.com/Gdmik5RhTN
— ANI (@ANI) September 25, 2019
याआधी फेब्रुवारी महिन्यात भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-21 विमान अपघातग्रस्त झाले होते. तर मार्च महिन्यात राजस्थानमधील बिकानेर येथे एक मिग-21 विमान कोसळले होते.