नवी दिल्ली - भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. देश कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. एका प्रवासी मजुराने आपल्या 2 महिन्यांच्या बाळाला विकल्याची संतापजनक घटना घडली आहे. 22 हजार रुपयांमध्ये त्याने आपल्या लेकराचा सौदा केला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे दारूसाठी पैसे हवेत म्हणून या बापाने आपल्या पोटच्या मुलाला विकण्याचा निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील एका प्रवासी मजुराने पैसे आणि दारुच्या हव्यासामुळे आपलं 2 महिन्यांचं बाळ विकलं. मदन कुमार सिंह असं मजुराचं नाव असून त्याने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकासोबत 22 हजार रुपयांना आपल्या मुलाचा सौदा केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अद्याप बाळाला आईकडे सोपवण्यात आलेले नसून शिशु विहारमध्ये आहे.
मदनच्या शेजारी राहणाऱ्या सेशुच्या बहिणीला अनेक वर्षांपासून मूल होत नव्हतं. जेव्हा त्यांना कळलं की मदनला मुलगा झाला आहे, तेव्हा त्यांनी मदनला विचारलं. मदनही बाळ दत्तक देण्यासाठी तयार झाला. जेव्हा मदन बाळ सोपवण्यासाठी पोहचला तेव्हा त्याने 50 हजारांची मागणी केली. अखेर त्यांनी शेवटी दोन महिन्यांच्या बाळाचा 22 हजार रुपयांचा सौदा पक्का केला. बाळाला विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी 22 हजारांचं कर्ज घेत बाळ विकत घेतलं. पोलिसांना प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी मदनचा शोध घेण्यास सुरुवात केली.
मदनची पत्नी सरिताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या नवऱ्याने तिला न सांगताच बाळाचा सौदा केला. जेव्हा तिला कळलं तेव्हा तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना कळलं आणि त्यांनी पोलिसांत तक्रार केली. दरम्यान सरितानं तिचा नवरा दारू पिण्यात सगळे पैसे घालवतो, त्यामुळं दोन वेळच्या जेवणासाठी घरात पैसे नसल्याचंही पोलिसांना सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला
CoronaVirus News : भयंकर! 'तो' आयसोलेशन वॉर्डमधून पळाला, गावभर फिरला; कोरोना पॉझिटिव्ह आला...
CoronaVirus News : बापरे! 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर
CoronaVirus News : भयंकर! आधी जिवंत व्यक्तीला केलं मृत घोषित, कुटुंबाला सोपवला भलताच मृतदेह पण...
Video - 'अम्फान'नंतर दोन गटांमध्ये जोरदार राडा, तुफान हाणामारी; पोलीस आले अन्...
CoronaVirus News : 'रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न', 'या' सरकारचा गंभीर आरोप
CoronaVirus News : दिलासादायक! देश कोरोनाची लढाई जिंकणार, 'हा' नवा फॉर्म्युला फायदेशीर ठरणार?