शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

दुष्काळामुळे स्थलांतर वाढले

By admin | Published: April 27, 2016 2:25 AM

दुष्काळामुळे लोक गावातून शहराकडे पलायन करीत असल्याचे महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने कबूल केले आहे.

नवी दिल्ली : दुष्काळामुळे लोक गावातून शहराकडे पलायन करीत असल्याचे महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने कबूल केले आहे. परंतु उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने मात्र अशा पलायनाचा इन्कार केला आहे.मंगळवारी राज्यसभेत पेयजल आणि स्वच्छता राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या २८ जिल्ह्यांमधील २८६६२ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. दुष्काळ परिस्थिती हाताळण्यासाठी येथील राज्य सरकारने आॅक्टोबर २०१५ ते जून २०१६ या कालावधीसाठी जलसंकट कृती योजना तयार केली होती. ज्यावर सध्या काम सुरू आहे. १८ एप्रिलपर्यत राज्यातील ३३५१ गावे आणि ५४०२ वस्त्यांमध्ये ४०१२ टँकर एवढा पाणीपुरवठा करण्यात आला आहे. पुढेही गरजेनुसार हा पाणीपुरवठा सुरु राहील. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना जलसंकट कृती योजना प्रभावीपणे लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. >मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांचे स्पष्टीकरणयादव यांनी सांगितले की, मध्य प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार बुंदेलखंड क्षेत्रात हातपंपातील रायझर पाईपच्या लांबीत वाढ, सिंगल फेज पॉवर पंप, निष्क्रिय पाईप पाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचा विकास, बोअरवेल, नव्या ट्युबवेल आणि टँकरचा वापर करुन पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने आपल्या वार्षिक अर्थसंकल्पात बुंदेलखंड क्षेत्रासाठी २०० कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे. याअंतर्गत ५० दुष्काळग्रस्त जिल्ह्णांमध्ये ५७८६ नवे हातपंप, ३५२७ रिबोर उभारणी आणि ४४० टँकर खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय १ लाख ६८ हजार ३७३ हातपंपांची दुरुस्ती केली जात आहे.