श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरपासून १६० किमी अंतरावर नियंत्रण रेषेलगत कुपवाडा जिल्ह्यातील तंगधारमध्ये बुधवारी सकाळी सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्करी छावणीवर हल्ला केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत हल्लेखोर तीनही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गोळीबारात एका नागरिकाचाही जीव गेला तर एक जवान जखमी झाला. दरम्यान, पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या लष्करी छावणीवर सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी मागच्या बाजूने हल्ला करण्यात आला. यात काही वाहनेही जळाली. स्वत:ला जैश-ए-मोहम्मदचा प्रवक्ता म्हणविणाऱ्या एका व्यक्तीने स्थानिक वृत्तसंस्थेच्या कार्यालयात दूरध्वनी करून संघटनेच्या तीन दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचा दावा केला आहे.पुंछमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्तसुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या एका मोठ्या तळाचा शोध घेत तेथून शस्त्रास्त्रे व स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला.गोपनीय सूचनेच्या आधारे लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने पुंछ जिल्ह्यात सालानी क्षेत्रात मंगळवारी शोधमोहीम राबविली होती. या तळावरून तीन किलो वजनाचे तीन आयईडी सिलिंडर, आयईडी (५०० ग्रॅम), दोन मॅग्झिन, ११२ काडतुसे, एक चिनी ग्रेनेड, पाक चलन ताब्यात घेण्यात आले.
लष्करी छावणीवर अतिरेकी हल्ला
By admin | Published: November 26, 2015 3:33 AM