शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

लष्करी उपकरणे, सुटे भाग भारतात विकसित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:51 AM

रणगाडे आणि लष्करीप्रणालीसाठी महत्त्वपूर्ण उपकरणे आणि सुट्या भागांचे उत्पादन भारतातच करण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रणगाडे आणि लष्करीप्रणालीसाठी महत्त्वपूर्ण उपकरणे आणि सुट्या भागांचे उत्पादन भारतातच करण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला आहे. ही उपकरणे आणि सुटे भाग आयात करण्यात येत असल्याने युद्धाच्या तयारीत कमालीची दिरंगाई होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशभरातील ४१ आयुध निर्माण कारखान्यांची संघटना असलेल्या मंडळाने सुटे भाग आणि अन्य उपकरणांची आयात ६० टक्क्यांवरून येत्या तीन वर्षांत ३० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.सीमावर्ती चौक्यांवर तोफखाना आणि अन्य महत्त्वपूर्ण सैन्य सामग्रीचा पुरवठा करण्याची व्यवस्था पाहणाऱ्या आयुध महासंचालकांनी रणगाडे आणि अन्य आयुधप्रणालींचे सुटे भाग भारतातच विकसित करण्यासाठी धोरण ठरविण्यासाठी भारतातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.आयुध निर्माण कारखान्यांचे मंडळ आणि आयुध महासंचालनालय दरवर्षी १० हजार कोटी रुपये किमतीचे सुटे भाग खरेदी करते. सैन्य दलांची अशी तक्रार आहे की, रशियाकडून महत्त्वपूर्ण सुटे भाग आणि उपकरणांच्या पुरवठ्यात खूप उशीर होतो. त्यामुळे या उपकरणांच्या देखभालीवर परिणाम होतो. भारताला लष्करी उपकरणांचा पुरवठा करणारा रशिया हा सर्वात मोठा देश आहे.१३ लाखांची फौज असलेल्या भारतीय लष्कराच्या मोहिमेच्या तयारीतील उणिवांवर विचार करूनच सरकारने सुटे भाग भारतातच विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून युद्धाची तयारी अधिक चोख करता येईल. चीनकडून मिळणाऱ्या युद्धाच्या धमक्या व पाकसोबतच्या तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने आता युद्धाच्या तयारीसाठी आयातीवर विसंबवून न राहण्याचे ठरविले आहे.भारत रशियाकडून घेणार नवे मिग-३५ ?भारताला रशिया नवे जेट मिग-३५ हे लढावू विमान विकण्याक उत्सूक आहे. भारताने हे विमान विकत घेण्याची इच्छा प्रकट केली असून त्याच्या गरजा काय आहेत हे समजून घेतले जात आहे, असे मिग कार्पोरेशनचने महासंचालक इल्या तारासेन्को यांनी सांगितले. मिग-३५ हे लढावू विमान लॉकहीड मार्टिनच्या पाचव्या पिढीतील एफ-३५ या लढावू विमानापेक्षा निश्चितपणे उत्तम आहे, असे ते म्हणाले. अमेरिकेच्या जेट विमानांना हवेतील लढाईत मिग-३५ हरवेल, असा दावाही तारासेन्को यांनी केला.मॅक्स २०१७ या हवाई कार्यक्रमानिमित्त येथे वार्ताहरांशी बोलताना तारासेन्को म्हणाले की, ‘‘गेल्या जानेवारी महिन्यात मिग-३५ सादर केल्यानंतर मिग कार्पोरेशननेमिग-३५ भारतात आणि जगाच्या इतर भागांत सादर करायला सक्रिय सुरवात केली. भारताला या विमानाचा पुरवठा करण्याचा आमचा विचार आहे आणि आम्ही भारताच्या हवाई दलाशी त्याच्या निविदा मिळवण्यासाठी सक्रिय आहोत, असे ते म्हणाले. मिग-३५ हे रशियाचे खूपच विकसित (फोर प्लस प्लस जनरेशन) बहुउद्देशीय लढावू विमान आहे.