ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - केंद्रातील भाजप सरकार हे जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे, या वादग्रस्त वक्तव्यावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर चौफेर टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
माझा सर्जिकल स्ट्राईक्सला पूर्ण पाठिंबा आहे. मी आधीचं हे स्पष्ट केले आहे. पण राजकीय पोस्टर, बॅनरवर भारतीय लष्कराचा वापर करण्याला माझा पाठिंबा नाही. अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवायला माझा पूर्ण विरोध आहे असे राहुल यांनी टि्वटरवर म्हटले आहे.
गुरुवारी नरेंद्र मोदी सरकारवर टीका करताना राहुल यांनी भाजप सरकार हे जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे असे वादग्रस्त विधान केले होते. देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. सर्जिकल स्ट्राइक करून लष्करानं स्वतःचं काम केलं. पण त्याचं श्रेय घेण्याचा भाजपानं प्रयत्न करू नये, असं म्हणत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
I fully support the surgical strikes and I have said so unequivocally, but I will not support using..(1/2)— Office of RG (@OfficeOfRG) October 7, 2016
the Indian Army in political posters and propaganda all across the country (2/2)— Office of RG (@OfficeOfRG) October 7, 2016