लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भारत आणि चीन सीमा परस्परांना भिडल्या आहेत. या प्रत्यक्ष नियंत्रण सीमारेषेवर सध्या तणावाची स्थिती आहे. चीन सातत्याने भारताच्या कुरापती काढत आहे. लडाखमध्ये चीनला भारताने रोखले. तसेच अरुणाचल प्रदेशातही चीनच्या उचापतींना चाप लावण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. तयारी काय?अरुणाचल प्रदेशालत चीनची सीमारेषा १३५० किमी लांबीची आहे. या सर्व ठिकाणी भारतीय लष्कराने पक्के रस्ते तयार केले असून सुरूंगांची पेरणी केली आहे. इस्रायलकडून मिळालेल्या ड्रोनने येथील सीमारेषेवर टेहळणी केली जाते. त्यामुळे चिनी लष्कराच्या बारिकसारिक हालचाली सहज टिपता येतात.जय्यत तयारीनेचिफू आणि सेला पास या ठिकाणी रस्त्यांचे जाळे उभारले जात असून विनाअडथळा तेथे जाता येणार आहे.पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत दोन्ही ठिकाणचे रस्ते तयार होतील. तवांग ते शेरगाव हा वेस्टर्न ॲक्सेस रोडही निर्माणाधीन अवस्थेत आहे. तवांगला रेल्वे नेटवर्कने जोडण्याची योजनाही आहे. पुलांची उभारणीअरुणाचलमध्ये सीमावर्ती भागापर्यंत पोहोचण्यासाठी सीमा रस्ते संस्थेतर्फे (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) अनेक रस्त्यांचे जाळे उभारले जात आहे. सुमारे २० पुलांची उभारणीही केली जात आहे. लष्करी चिलखती गाड्या, रणगाडे, इतर वाहने यांचा भार तोलू शकतील अशा पद्धतीने या पुलांची उभारणी होत आहे. बॅटलफील्ड ट्रान्सफरन्सीयुद्धभूमीपर्यंत लष्कराला तातडीने पोहोचता यावे यासाठी रस्त्यांचे जाळे विणणे सुरू असल्याचे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. त्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. लष्कराच्या ५ माऊंटन डिव्हिजनकडे भूतानच्या पश्चिमेकडील सीमावर्ती भागापर्यंत टेहळणी करण्याची जबाबदारी आहे. ही डिव्हिजन सदैव सज्ज असून कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी तय्यार आहे, असे डिव्हिजनच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अरुणाचल प्रदेशात चीनच्या उचापती थांबविण्यासाठी लष्कराची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 6:33 AM