मेवात/नवी दिल्ली : दुधाचा व्यवसाय करणाऱ्या पेहलू खान (५५) यांनी दुभती म्हैस विकत घेण्याऐवजी दुभती गाय विकत घेतली आणि त्याला कसाई समजून गोरक्षकांनी ठारच मारले. या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. संसदेतही गुरुवारी हा विषय उपस्थित झाला.जयसिंहपूरमध्ये (नूह तहसील, मेवात) पेहलू खान यांचे घर आहे. ते दुभती म्हैस विकत घेण्यासाठी शुक्रवारी जयपूरला गेले. शनिवारी म्हशीऐवजी दुभती गाय विकत घेतली. माझ्या वडिलांनी घेतलेला हा निर्णय सर्वांत वाईट ठरला व त्याने माझ्या वडिलांचा जीव घेतला, असे त्यांचा मुलगा इर्शाद (२४) याने सांगितले. गोरक्षकांनी शनिवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग आठवर अलवारच्या बेहरोर भागात पेहलू खान यांना इतकी मारहाण केली की त्यात ते मरण पावले. त्या वेळी इर्शाद आणि त्याचा भाऊ आरीफ हे वडिलांसोबत होते. पिकअप ट्रकमध्ये माझे वडील होते. आमच्याच गावातील अझमत हेदेखील त्यांच्यासोबत होते. ट्रकमध्ये दोन गायी व दोन कालवडी होत्या. इर्शाद, मी आणि आणखी एक ग्रामस्थ दुसऱ्या पिकअप ट्रकमध्ये होते व या ट्रकमध्ये तीन गायी व तीन कालवडी होत्या, असे आरीफने सांगितले. गोरक्षकांनी आमची वाहने कशी अडवली, आम्हाला बाहेर कसे खेचले आणि काठ्या व पट्ट्यांनी कसा हल्ला केला याचे वर्णन त्याने केले. पोलीस आले ते २० ते ३० मिनिटांनी.गोरक्षकांनी त्यांच्यावर कत्तलीसाठी गायींची तस्करी केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनीही त्यांच्यावर कत्तलीसाठी जनावरांची बेकायदा वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल केला. एफआयआरमध्ये खान आणि इतरांकडे गायी विकत घेतल्याची कागदपत्रे वा पावती नव्हती, असे नमूद केले आहे. इर्शादने पावती दाखवून गायी खरेदी केल्याचा दावा केला. या पावतीवर जयपूर महानगरपालिकेचा शिक्का आहे.>राज्यसभेत चिंता; चौकशी करून वस्तुस्थिती मांडण्याचे आदेशया प्रकरणाबद्दल राज्यसभेत गुरुवारी सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. उपसभापती पी. जे. कुरियन यांनी सरकारने या घटनेची चौकशी करून वस्तुस्थिती सभागृहात ठेवावी, असे आदेश दिले. विरोधी पक्ष आणि सरकारकडून या घटनेबद्दल परस्परविरोधी विधाने केली शून्य कालावधीत काँग्रेसचे मधुसूदन मिस्त्री यांनी राजस्थानात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडल्याचे सांगितले. अशाच घटना उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरातमध्ये घडल्या असून या राज्यांत भाजपाचीच सत्ता आहे, असेही ते म्हणाले.>त्यांच्याशी सहमत नसलेल्यांना देशात जागा नाहीगोरक्षकांच्या हल्ल्यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.त्यांच्याशी सहमत नसलेल्यांना देशात जागा राहिली नाही आणि सरकार जेव्हा स्वत:ची जबाबदारी सोडून देते त्या वेळी मोठ्या शोकांतिका घडतात, असे म्हटले. मोदी हे अशा दृष्टीकोनाचा प्रचार करीत आहेत की तेथे फक्त एकच एक कल्पना अस्तित्वात राहील, अशा शब्दांत गांधी यांनी त्यांच्यावर हल्ला केला.मोदी किंवा संघाशी जे सहमत नाहीत किंवा त्यांचे ऐकत नाहीत त्यांना भारतात स्थान नाही. हाच दृष्टीकोन आहे, असे गांधी संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. राजस्थान सरकार गप्पया हत्येबद्दल राजस्थान सरकारने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्याचे सर्व मंत्री तसेच भाजपाचे मंत्री यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.गोरक्षण अधिभारगोरक्षणासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी राजस्थानमध्ये न्यायालयीन दस्तावेजांखेरीज अन्य दस्तावेजांच्या मुद्रांक शुल्कावर १० टक्के अधिभार लागू करण्यात आला आहे.
गोरक्षकांच्या हल्ल्यात दूध व्यावसायिक ठार!
By admin | Published: April 07, 2017 4:03 AM