गुजरातमध्ये पोलिकांनी पकडलेल्या एका चोराच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरातमधील वापी येथे १ लाख रुपयांच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी सुरू केली तेव्हा या चोराची हायप्रोफाइल लाईफस्टाईलबाबत ऐकून पोलीसही अवाक् झाले. आरोपी रोहिल सोलंकी हा आलिशान हॉटेलांमध्ये थांबायचा. तसेच विमानामधून प्रवास करायचा.
गुजरात पोलिसांनी सांगितले की, आरोपी रोहित सोलंकी याने अनेक राज्यांमध्ये चोऱ्या केल्या आहेत. मागच्या महिन्यामध्ये रोहित सोलंकी याने वापी येथे एक लाख रुपयांची चोरी केली होती. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर पोलीस चोराचा शोध घेत होते. त्यामधून या हायप्रोफाईल चोराचा छडा लागला.
या प्रकरणी पोलिसांनी रोहिल सोलंकी याला अटक केली. जेव्हा रोहितची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा चोरीच्या पैशातून रोहितने मौजमजा केल्याचे आणि आलिशान जीवन जगल्याचे समोर आले. आरोपी रोहितने १९ चोऱ्या केल्याते कबूल केले. त्यामध्ये वलसाडमध्ये ३, सूरत, पोरबंदर आणि सेवालाल येथे एक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन आणि महाराष्ट्रात एका ठिकाणी चोरी केली.
आरोपी रोहित याने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये आणखी सहा चोऱ्या केल्याचेही कबूल केले. त्याच्याविरोधात अनेक राज्यांमध्ये गुन्हे नोंदवलेले आहेत. दरम्यान, रोहितने मुस्लिम महिलेशी विवाह करण्यासाठी आपलं नाव बदलून अरहान असं ठेवल्याचंही पोलीस तपासामध्ये उघड झालं आहे.